कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव मनीष भारंबे अखेर दोषी,तपासात पोलिसांच्या हाती अनेक सुगावे

0
1171
Google search engine
Google search engine

कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव मनीष भारंबे अखेर दोषी, तर बाजार समिती मधील 20 संचालक याना फौजदारी प्रक्रिया संहिता 41 अ च्या वेगवेगळ्या दिनाकाच्या नोटीस
K
कृषिउत्पन बाजार समिती आज पोलीस स्टेशन च्या प्रागणात,ते तीन आरोपी अजूनही फरारच

चांदुर बाजार:-

स्थानिक चांदुर बाजार तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवारात चांदुर बाजार पोलिसांनी अमानुष पणे कोंडून अवैध जनावराची वाहतूक करण्याचा डाव हाणून पाडला.तसेच आरोपी याना तत्काळ अटक सुद्धा करणयात आली.यामध्ये बाजार समिती मधील अस्थयी कर्मचारी याना अटक झाल्यानंतर प्रकरण वेगाने तपास सुरू झाला.बाजार समिती सचिव आणि काही मोजक्या संचालक यांची चौकशी बुधवार ला झाल्यानंतर पोलिसांना अनेक रहस्य उलगडत गेले.त्यामुळे त्यांनी दिनांक 14 जून ला गुरुवारी पुन्हा सचिव यांची चौकशी केला असता अपराधीक कट आणि वाचविण्यासाठी दस्तऐवज फेरफार केल्या प्रकरणी 120 ब,भादवी 34 नुसार त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
त्यांना मेडिकल करण्यासाठी पाठविले असता तब्येत ठीक नसल्याने त्यांना अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.तर या प्रकरणात आरोपी यांची संख्या आता 10 वर पोहचली आहे.

या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपी बाबत सुद्धा पोलीस याना सुगावा लागला असल्याने लवकरच ते अटक होणार असल्याचे दिसून येत आहे.दिनांक 15 जून बाजार समिती मधील सर्वच वीस ही संचालक याना फौजदारी प्रक्रिया सहिता 41अ नुसार वेगवेगळ्या दिवशी पोलीस स्टेशन ला चौकशी साठी हजर राहण्याबाबत आणि सहकार्य करण्याबत च्या नोटीस देण्यात आल्या.त्यामुळे संचालक यांची चौकशी कसून होणार हे नक्की.

खूप जुने कनेक्शन
चांदुर बाजार तालुक्यातील चार पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा जेव्हा अवैध जनावर वाहतूक करण्यावर कार्यवाही करण्यात आली.तेव्हा त्यांना पावती दाखवून सोडण्यात आले.त्यामुळे या मध्यरात्री पावती मिळत असल्याने प्रकरण खूप दिवसापासून सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे बरेच दा पोलिसांना कार्यवाही करण्यासाठी गेले असताना रिकाम्या हाती परतावे लागले असे बोलले जात आहे.

या सर्व प्रकरण मध्ये ठाणेदार म्हणून असलेले आयपीएस अधिकारी समीर शेख आणि स्थानिक पोलीस स्टेशन मधील टीम दिवस रात्र काम करीत असल्याचे दिसत आहे. तर संपूर्ण प्रकरणाचा तपास समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.