नरखेड तालुक्यात वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावात परिवर्तन – गट विकास अधिकारी दयाराम राठोड यांनी साधला गावकऱ्यांशी संवाद !

0
1648
Google search engine
Google search engine

वॉटरकप स्पर्धेदरम्यान, लोकसहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे !

शेततळी आणि सीसीटी भरून ओढ्या, नाल्यात पाणी साठल्याने ग्रामस्थांनी या पाण्यात उतरून केला आंनदोत्सव साजरा .

गायमुख , बरड पवनी , उमठा या गावांना दिल्या भेटी !

नरखेड तालुका- रुपेश वाळके :-

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या पाणी

फाउंडेशन ने वॉटर कप च्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातिल हजारो गावे दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर असून नरखेड तालुक्यातील गावकऱ्यांनी आपले गाव पाणीदार करून दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे . प्रत्येक गावातील नागरिकांचे मानसंधारण होऊन जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी गावकरी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन ४५ दिवस रात्रंदिवस काम करून गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशन च्या वॉटर कप स्पर्धेमध्ये लहान मोठ्या सह महिला मंडळींनीही मोठ्या प्रमाणात श्रमदान केले .

नरखेड तालुक्यातील गावांमध्ये डोंगर परिसरात पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून लोकसहभागातून करण्यात आलेल्या जलसंधारनाची कामे गावकऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून पूर्ण केले.

लोकसहभागातून व श्रमदानाच्या माध्यमातून झालेल्या गावातील कामांची पाहणी नव्याने रुजू झालेल्या नरखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दयाराम राठोड यांनी गायमुख , बरडपवनी , उमठा , या गावांना भेटी देऊन लोकसहभागातून झालेल्या कामांची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक रुपेश वाळके , अतुल तायडे , प्रवीण दहेकर , ओम खोजरे , भास्करराव विघे , यांच्यासह उमठा , बरड पवनी , गायमुख येथील नागरिक उपस्थित होते .

नरखेड तालुक्यात पाणी फांउडेशनकडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यावर्षी नरखेड तालुक्यातील सहभागी गावात राबविण्यात आली. दुष्काळाच्या स्पर्धेदरम्यान गावक-यांना श्रमदानातून गाव दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प करत ४५ दिवसात तापत्या उन्हात जलसंधारणाची कामे श्रमदानाच्या माध्यमातून केली. या कामातून तालुक्यातील गावातील ग्रामस्थांचे श्रमदानातून जलसमृध्दी साकारली असून त्यांचे श्रम सार्थकी लाभल्याचे नुकत्याच झालेल्या पावसावरुन दिसून येते. साचलेल्या पाण्याजवळ श्रमदान करणारे ग्रामस्थ सेल्फी काढून आनंद व्यक्त करीत आहेत.

नरखेड तालुक्यातील २५ गावात श्रमदान व यत्रांच्या सहायाने जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात झाली. पावसाचे पाणी जमिनिवर पडल्यानंतर वाहून जाते. परीणामी गावकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवणे व चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकविणे व थांबलेल्या पाण्याला मुरवायला शिकविणे. या पाणी फांउडेशनच्या सुत्रानुसार नरखेड तालुकयातील ४५० गावकऱ्यांनी सत्यमेव जयते वॉटर कपचे प्रशिक्षण पुर्ण केले. या २५ गावाला जलंसंधारणाची कामे यत्रांच्या व श्रमदानाच्या माध्यमातून झाली. स्पर्धेदरम्यान गावकऱ्यांनी ४५ दिवस श्रमदान करून आपल्या गावात सि.सि.टी, डिप.सि.सिटी, नाला खोलीकरण, शेततळे ,गॉबीयन बंधारा, एल.बी.एस आदी जलसंधारणाची कामे केली. गावकऱ्यांनी रात्रंदिवस श्रमशक्ती वापरून गावात पाणी साठा निर्माण करण्यासाठी जी जलपात्रे तयार केलीत. त्यात फक्त वाट होती पावसाची, उमठा येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. श्रमातून तयार केलेल्या पात्रामध्ये मोठया प्रमाणात पाणी साठा निर्माण झाला. गावातील पाणी वाहुन गेले नाही. हे गावात साचलेले पाणी पाहुन गावकरी आनंद व्यक्त करीत आहे. त्या पाण्यासोबत सेल्फी काढून श्रमाचे पाणी त्यांच्या गावातच दिसत आहे .