कडेगांव नगरपंचायतीच्या कारभाराचे जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश !

0
1030
Google search engine
Google search engine

कडेगांव/हेमंत व्यास :-

कडेगांव नगरपंचायतीचे भाजपा नगरसेवक विरोधीपक्ष गटनेते उदयसिंह देशमुख व इतर सात नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे विविध कामांचा निधी व नगरपंचायतीच्या गलथान व मनमानी कारभारामुळे विरोधात म्हणुन निर्यात मिळेपर्यंत ‌आमरण उपोषण करीत असल्याचे कल‌विले होते.याच अनुषंगाने जिल्हाधिकारी विजय श्री करण पाटील यांनी याबाबत कडेगांव पलुसचे उपविभागीय अधिकारी डाॅ.अभिनव देशमुख यांना चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्त केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारी अर्जात एकंदरीत कडेगांव नगरपंचायतीचे होऊन दिड ते दोन वर्षे कालावधी झाला असेल मात्र कडेगावातील नागरीकांना शुध्द पिण्याचे पाणी,रस्ते, गटार व्यवस्था,शहरात जागोजागी बंद पडलेले स्ट्रिट लाईट व्यवस्था ,घनकचरा इत्यादी सुविधांच्या अभावामुळे नागरीक हैराण झाले त्यामुले नगरपंचायतीच्या कामकाजाबाबत पारदर्शकतेचा अभाव दिसुन आला शहरात काही कामकाजात असंख्य त्रुटी आहेत.चांगले ठेकेदार नगरपंचायतीकडे पाठ फिरवतात.नगराध्यक्षांच्या प्रभाग ९मध्ये लोखंडी पोल बसविण्याचे टेंडर असताना चर्या ठिकाणी ठेकेदाराने सिमेंटचे पोल बसवले आहेत.व लोखंडी पोलचे बिल काढावे म्हणुन सत्ताधारी व ठेकेदार मुख्याधिकारी यांचेवर दबाव आणत आहेत.हे गैरकृत्य करून देणार नाही तर याच बरोबर बहुमताच्या जोरावर भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात अन्याय केला जात आहे.तसेच ३० मे रोजी बेकायदेशीर घेतलेल्या सर्व साधारण सभेची चौकशी होणार आहे. इत्यादी सर्व तक्रारीची दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली असुन त्यासाठी कडेगांव पलुस चे उपविभागीय अधिकारी डाॅ.अभिनव देशमुख यांच्यावतीने पंधरा दिवसांत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.याची प्रत कडेगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना कार्यवाहीसाठी व नगराध्यक्ष यांना माहीतीसाठी देण्यात आली आहे.