लोणी पोलिसांची दबंग कार्यवाही,तक्रार दाखल होताच आरोपी काही तासात अटक

0
1100
Google search engine
Google search engine


लोणी पोलिसांची दबंग कार्यवाही,तक्रार दाखल होताच आरोपी अल्पशा कालावधी मध्ये जेरबंद

प्रतिनिधी लोणी:-

लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या संधू धाब्यावर जवळ ट्रकर अडवून रुपये 8000 रोख लंपास केल्याची घटना आज दिनांक 19 जून ला दुपारच्या सुमारास घडली यांची तक्रार भेराराम जयराम जाठ यांनी लोणी पोलीस स्टेशन गाठले आणि आपली तक्रार नोंदविली.तक्रार दाखल होताच ठाणेदार नागेश चतरकर यांनी आपली एक टीम ज्या दिशेने आरोपी गेले त्या दिशेने म्हणजे वाशिम च्या दिशेने पाठविले.
नागझरी वाहतूक मदत केंद्रावर त्यांनी वाहतूक कर्मचारी यांच्या साहाय्याने नाकाबंदी केली.आणि पोलिसांना माहिती मिळाली की तक्रार मध्ये नोंदविलेल्या गाडी क्रमकाची चौकशी केली असता संबंधित आरोपी हे नोव्हेल हॉटेल मध्ये आहे.त्यावरून लोणी पोलीस आणि वाहतूक पोलीस याच्या मदतीने आरोपी ला अटक करण्यात आली.मो.सादिक मो.मुसा वय 30 रा सागर नगर खोलपुरी पोलीस स्टेशन जवळ अमरावती, अश्फाक बेग हमला बेग वय 30 खोलपुरी पोलीस स्टेशन जवळ अमरावती, सदर आरोपी पासून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.तसेच या गुन्ह्यात आरोपी यांनी वापरलेली मोटरसायकल अमरावती येथील चोरीची असल्याची माहिती पोलिसांना लागली आहे.ही कार्यवाही लोणी पोलीस स्टेशन ठाणेदार नागेश चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पोलिस टीम यांनी वाहतूक पोलीस यांच्या मदतीने केली.