पोलिसांनी गंभिर गुन्ह्याच्या केलेल्या योग्य तपासा मुळे वाचले तीन तरुणांचे आयुष्य

0
755

 

 

आकोटः

जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांनी एका दाखल गंभीर गुन्ह्याचा तपास पारदर्शक व योग्य रीतीने करून 3 तरुणांचे आयुष्य बरबाद होण्या पासुन वाचवले.कायद्याच्या चक्रव्हीवातुन कुठलाही तरुण नाहक बरबाद न व्हावा यासाठी कसुन केलेल्या या तपासामुळे पोलिसांची सकारात्मक प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण करण्याचा अकोट शहर पोलीसांचा प्रयत्न हा निश्चितच यशस्वी ठरला आहे. ह्या बाबत प्राप्त माहिती प्रमाणे अकोट शहरातील उज्वलनगर भागात राहणारे प्रशांत गावंडे ह्यांनी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की ते दिनांक 15 जुनला रात्री 9.30 वा.मोटर सायकल ने आपल्या घरी जात होते. एका काळ्या रंगाच्या हिरो होंडा स्प्लेनडर मोटर सायकल वर तीन तरुण आले व त्यांनी त्यांचेवर हल्ला करून त्यांचे गळ्यातील 3 तोळे वजनाची सोन्याची साखळी तोडून नेण्याचा प्रयत्न केला .व पळून गेले, पळून जातांना त्यांचे मोटर सायकल चा क्रमांक त्यांनी पहिला होता,अश्या आशयाच्या त्यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी कलम 393 प्रमाणे गंभीर गुन्हा नोंद करून पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्वरित तपास सुरू केला. ठाणेदार शेळके यांनी याकामी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, हेड कॉन्स्टेबल संजय घायल व त्यांचे टीम ला कामाला लावले. मोटर सायकल चा शोध घेतला असता पोलीस मुळ मालका पर्यंत पोहचले अधीक तपासाअंती पोलीसांना त्या राञी मोटरसायकल वापरणारे तिन्ही तरुणही निष्पन्न झाले. ह्या गंभीर गुन्ह्याचा स्वतः पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी बारकाईने पडताळणी केली असता माञ वेगळीच हकीकत समोर आली. हकीकत अशी की त्या दिवशी मोहन बेराड वय 22 रा.बळीराम चौक , अक्षय डोबाळे वय 22 शिवाजी नगर , शुभम ताडे वय 20 रा, मोठे बरगण तिन्ही तरुण घरी जात असतांना उज्वल नगर येथील वळणावर समोरून येणाऱ्या मोटर सायकल ला कट लागला त्या वरून समोरील इसमाने त्यांना शिवीगाळ केल्याने त्याचा राग येऊन ह्या तिन्ही तरुणांची त्या इसमा सोबत बाचा बाची होऊन किरकोळ लोम्बा झोंबी झाली .त्या मुळे त्या इसमाचा शर्टाचा कॉलर फाटला.नंतर काही लोकांनी त्यांचे भांडण सोडविले व ते तरुण निघून गेले, ते इसम म्हणजेच फिर्यादी प्रशांत गावंडे ह्यांची ह्या भांडणात गळ्यात असणारी सोन्याची चैन तुटल्याने व ते तिन्ही तरुण अनोळखी असल्याने त्यांनी तिन्ही तरुणां विरुद्ध चेन तोडून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली, परंतु पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीसांनी बारकाईने व पारदर्शक तपास करून दोन्ही पार्टीना समोर आणून वास्तुस्थिची जाणीव करून दिली.फिर्यादीचा गैरसमज दूर करून तसे फिर्यादीचे प्रतिज्ञा पत्र घेऊन तिन्ही तरुणावर होणाऱ्या गंभीर कार्यवाही पासून तूर्तास तरी सुटका केली आहे.फिर्यादीच्या व तरुणांच्या मधे झालेल्या किरकोळ वादामुळं तिन तरुणांचे आयुष्य उव्धस्त होता होता वाचले. तर याप्रकरणी ठाणेदार गजानन शेळके यांच्या योग्य तपास तथा जागृक पोलिसिंग मुळं तीन निरपराध तरुणांचे भविष्य अंधकारमय होण्या पासून वाचवून अकोट शहर पोलिसांप्रती समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे.दरम्यान आश्या प्रकरणांमुळं किरकोळ कारणातुन तरुणाईच्या मनात गुन्हेगारी प्रवृत्ती रुजण्यापासुन वाचवण्यात

 

ठाणेदार गजानन शेळके यशस्वी झालेत यात शंका नाही.अन्यथा अश्या लहान सहान प्रकरणांतुन यंञणा राबवत आयुष्य बर्बाद होण्यात वेळ लागत नाही हे नव्याने सांगण्याची गरज नाही..