लासलगाव येथे आज उन्हाळ कांद्याला 1373 रुपये भाव

0
1513
Google search engine
Google search engine
लासलगाव(उत्तम गिते)
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (दि. 22) रोजी उन्हाळ कांद्याला तीन महिन्यांच्या कालावधीनंतर क्विंटल मागे 1373 रुपये भाव मिळाल्याने बळीराजा खूश झाला आहे. यावेळी उन्हाळ कांद्याची 23,955 क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत वाढ होत असून, येत्या काही दिवसांत कांदा 1500 रुपये क्विंटल दराने विकला जाण्याची शक्यता काही कांदा व्यापार्यांनी वर्तवली आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती सभापती जयदत्त होळकर यांनी दिली. बहुतेक शेतकर्यांनी कांदा विक्रीस न आणता तो चाळीत साठवून ठेवला आहे.
या मुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम देशपातळीवर होऊन कांद्याच्या आवकेत घट झाली आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील कांद्यास देशपातळीवर उन्हाळ कांद्याची मागणी वाढली आहे. यामुळे गत सप्ताहापासून कांद्याच्या बाजारभावात नियमित वाढ होत आहे. त्यामुळे बाजारभावात झालेल्या वाढीमुळे शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या बाजार भावातून उत्पादन खर्च निघणार आहे. देशांतर्गत व परदेशात महाराष्ट्रातील कांद्यास मागणी वाढल्याने कांदा बाजार भावात वाढ झालेली आहे. बाजार भावात सुधारणा झाली असली तरी लासलगाव बाजार समितीत शेतीमालाची आवक स्थिर आहे. आज (दि.22) कांदा लिलावास सुरुवात होताच क्विंटलमागे 1373 रुपये दर मिळाल्याने शेतकरी खूश झाले. सरासरी कांद्यास 1200 तर कमीत कमी 500 रुपये इतका बाजारभाव मिळाला.