चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असतांना स्थानिक बापूसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थिनी व राजना येथील रहिवासी काजल वाघमारे हिने दहावीच्या परीक्षामध्ये ९१ टक्के गुण घेऊन नावलौकिक कामगिरी केली आहे.
काजलचा भाऊ याने सुद्धा बारावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. काजल वाघमारे हिचे आईवडील हातमजुरीची कामे करतात आणि आपल्या मुला-मुलींना चांगले शिकविण्याचा त्यांचा मानस आहे. काजल आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, शिक्षक तसेच आई – वडिलांना देते.
काजलने यश संपादन केल्याबद्दल तिचे माजी पंचायत समिती सभापती बबनराव गावंडे, जनता दल (से.) चे युवा जिल्हाध्यक्ष अवधूत सोनवणे, राजना चे सरपंच चंद्रमणी गजभिये, उपसरपंच संध्याताई गावंडे, गजानन गावंडे, चंद्रशेखर थाये आदींनी अभिनंदन केले आहे.