सुभाष मंडळात महाराणा प्रतापसिंग जयंती साजरी नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सहभाग

208
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांची ४७८ वी जयंती स्थानिक सुभाष मंडळाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी हजर होते.
      चांदूर रेल्वे मुख्य रस्त्यावर असलेल्या सुभाष मंडळाच्या सभागृहात विर शिरोमणी महाराजा राणा प्रतापसिंग यांच्या ४७० व्या जयंतीनिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. राजीव आंबापुरे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. अरुण जिचकार, छोटू विश्वकर्मा, कोषाध्यक्ष सुमेरसिंग भैसे, संस्थापक दीपक सोळंके आदी उपस्थित होते. सुरूवातीला फोटोचे विधीवत पुजन करण्यात आले. फोटो पुजनानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रतापसिंग यांच्या जीवनावर व कार्याबाबत मार्मीक विवेचन केले.
          कार्यक्रमाला नितीन जयस्वाल, पराग मेंढे, वाढोणकर, भारत भैसे, उत्तम बावनथडे, किशोर यादव, विजय मानकर, प्रदिप मानकर, नगर परीषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी उत्तमराव गावंडे, मनोहर मानकानी, वसंत बोबडे, लक्ष्मण आवतरामाणी, बलदेव वानखडे, सुलेमान शाह, रामचंद्र मकेश्वर, भाष्कर चनोटकार, मोरेश्वर शिंगरे, वसंतराव गहुकार आदींची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे संचलन पराग मेंढे यांनी तर आभार प्रदर्शन भारत भैसे यांनी केले.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।