परळीत अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला

0
836
Google search engine
Google search engine

परळीत अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला

प्रतिनिधी- दिपक गित्ते

परळी-वै :- परळी  शहरापासून  जवळच असलेल्या अंबाजोगाई रोडवरील सपना हाॅटेलच्या समोरील मोकळ्या जागेत आज रविवार दिनांक 24 रोजी सकाळी अज्ञात  व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  आरोपींचा शोध घेण्यासाठी  परळी  पोलिस तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून परळी शहरात मोठ्या प्रमाणात चोरी, अवैध धंदे यांना उत आला असून  याला आळा घालण्यात परळी  पोलिसांना अपयश आले आहे. दरम्यान दररोज सकाळी नागरिक   परळी  शहरापासून  जवळच असलेल्या अंबाजोगाई रोडवर माॅर्निगवाॅकला फिरायला जात असतात. याच दरम्यान  सपना हाॅटेलच्या समोरील मोकळ्या जागेत आज रविवार दिनांक 24 रोजी सकाळी अज्ञात  व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून  मृतदेहाची ओळख अद्याप   पटली नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.   हि घटना  खून करुन त्याठिकाणी  आणून टाकला असावा अशी शक्यता  वर्तविली जात आहे.