त्या मयताची ओळख पटली…रेल्वे पोलिस नागनाथ मुंडे यांचा मृतदेह असल्याची माहिती

0
1408
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

परळी शहरापासून जवळच असलेल्या अंबाजोगाई रोडवरील सपना हाॅटेलच्या समोरील मोकळ्या जागेत आज रविवार दिनांक 24 रोजी सकाळी उदगीर येथे पोष्टींग असलेले रेल्वे काॕन्सटेबल बक्कल नंबर 376/ नागनाथ मुंडे या व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी परळी पोलिस तपास करीत आहेत.


याबाबत अधिक माहिती माहिती अशी की, दररोज सकाळी नागरिक परळी शहरापासून जवळच असलेल्या अंबाजोगाई रोडवर माॅर्निगवाॅकला फिरायला जात असतात. याच दरम्यान सपना हाॅटेलच्या समोरील मोकळ्या जागेत आज रविवार दिनांक 24 रोजी सकाळी उदगीर येथे पोष्टींग असलेले रेल्वे काॕन्सटेबल बक्कल नंबर 376/ नागनाथ मुंडे राहणार वडगाव ता.जळकोट जि.लातुर या व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाची ओळख पटली आहे. या मयताला शवविच्छदेनासाठी परळी उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.
पुढील तपास पोलिस करीत आहेत.