पुलाची उंची वाढवण्याबाबत प्रहार चे जिल्हापरिषद बांधकाम अभियंत्यांना निवेदन – आंदोलनाचाही इशारा

0
1023
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी /दर्यापुर

तालुक्यातील इटकी आंतरगाव ग्रामपंचायत अंतर्गत इटकी ते दर्यापूर फाट्या मधील असलेल्या दोन्ही पुलांची पावसामूळे दयनिय व्यवस्था झाली असून पूर आल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना रात्रभर रस्त्यावर थांबावे लागले या बाबत दर्यापुर येथील तहसिलदार राहूल कुंभार यांनी घटना स्थळाची पाहणी करून जिल्हाधिकारी यांच्या कडे अवहाल सादर केला अध्याय पर्यत कुठलेही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येत आहे.सदर पुलाची उंची वाढवून त्वरीत दुरुस्ती करण्या संदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रशांत गांवडे यांच्या कडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप वडतकर , दर्यापुर विधानसभा संपर्कप्रमुख प्रदिप चौधरी यांनी लेखी निवेदन सादर करून त्वरित पूलाची उंची वाढविण्यासाठी चर्चा केली.परंतु प्रभारी कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे यांनी सध्या स्थितीत उंची वाढविणे किंवा पूलबांधणी करिता जिल्हा परिषद निधी उपलब्ध नसल्यामुळे काम करणे शक्य नाही असे उडवाउळीवे उत्तर देऊन मोकळे झाले.

कमी उंचीचे पूल असल्याने पावसाळ्यात थोड्या प्रवासामुळे सुद्धा या पुलावरून पाणी वाहून जाते.यामुळे दरवर्षी पावसाळ्यात ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना शेतकरी शेतमजुरांना पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रात्र रात्र पुलाजवळ थांबून राहावे लागते.महत्त्वाचे म्हणजे शालेय विद्यार्थी पुलावरून पाणी असल्यास संपूर्ण रात्रभर पुलाजवळ वास्तव्य करतात ही परिस्थिती यापूर्वी तहसीलदार साहेब यांनी अनुभवली आहे. प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी दूसरीकडे मात्र शहरांमध्ये कारण नसताना रस्त्याचे डांबरीकरण काँक्रिटीकरण होत असताना ग्रामीण भागातील रस्ते पूल रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी निधी उपलब्ध नाही शहरी व ग्रामीण भागातील विकासाची विषमता हि चिंतनीय दुर्दैवाची बाब आहे ग्रामस्थांची कायमची उदभवनारी समस्याबाबत गांभीर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना करण्यात करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे….