ईद मिलन मुळे होते एकतेचे दर्शन : आ भारसाकळे ठाणेदार गजानन शेळकेंचे मुस्लिम बांधवांनी केले भरभरुन कौतुक

0
896
Google search engine
Google search engine

अकोट – मुस्लिम समाजाचा मोठा सण मानल्या जाणारा पवित्र रमज़ान महिन्यात एक महीना उपवास ठेवल्या जातात .अशातच रमज़ान महिन्यात खरेदी व इतर वस्तु साठी रात्री ११: ३० वाजेपर्यंत शौकत अली चौकात मुस्लिम बांधवांनी खरेदी साठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता बैरिकेट्स तथा सुरक्षा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला. खाकीचे खरे कर्तव्य बजावणारे अकोट शहर पो स्टे चे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी राञ अन दिवस एक करत प्रत्येक वेळी योग्य कर्तव्य बजावले .कर्तव्यदक्ष ठाणेदारांच्या या कार्यासाठी भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे जिल्हा उपाध्य्क्ष अहेमद खान तर्फे त्यांचे निवास्थानी ईद मिलन कार्यक्रमात त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी आ.प्रकाश भारसाकळे म्हणाले की ईद मिलन मुळे सर्व हिंदू मुस्लिम बांधवा मध्ये एकता अखंडता भाईचारा प्रेम बंधुत्व अणि एकामेकांशी नाते जुड़तात त्यामुळे खरोखरच ईद मिलन कार्यक्रमात एकतेचे दर्शन होते.यावेळी शिरखुरमा चा सर्वांनी अस्वाद घेतला. कार्यक्रमाला अकोट न पा चे नगराध्यक्ष हरीनारायण माकोडे भाजपा जिल्हा संपर्क प्रमुख राजेश नागमते अल्पसंख्यक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेरुद्दीन पंचगव्हाणकर भाजपा अकोट शहर अध्य्क्ष कनक कोटक न पा उपाध्य्क्ष अबरार खाँ शमशेर खाँ माजी नगराध्यक्ष पुरूषोत्तम चौखंडे पर्यावरण प्रेरणा समिती चे अध्य्क्ष जावेद अली मिरसाहेब स्वीय सहाय्यक सुनील कराळे जिल्हा महामंत्री सय्यद इमरान अली जिल्हा उपाध्य्क्ष बद्रोद्दीन मुश्ताक आहादउल्ला खाँ पटेल ,हरिष टावरी, तालुका अध्य्क्ष मुकद्दर खाँ उर्फ़ कालू भाई ओबीसी आघाडी तालुका प्रमुख किशोर गावंडे, मोहिब ठेकेदार अकील बेग अमरुल्ला शाह लतीफ खाँ अताउल्ला खाँ असलम तौफीक पटेल सकीब पटेल नासिर खाँ यांचे सह भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संखेने उपस्थित होते असे एस एहमद यांनी कळवले आहे.