*आदिशक्ती मुक्ताईची पालखी आज चिखलीत..*

0
1766
Google search engine
Google search engine

आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळा २०१८,मुक्ताईनगर ते पंढरपुर

पंढरपुर आषाढी एकादशी सोहळ्यासाठी मुक्ताईनगरहुन पायी निघालेला पालखी सोहळा आज दि.२६ जुन ला सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान चिखलीत दाखल होणार आसुन रात्रीचा मुक्काम श्री रेणुकादेवी संस्थान मध्ये असणार आहे.

आज सकाळी येळगाव येथुन निघुन दुपारचा विसावा हातनी येथे घेऊन संध्याकाळी चिखलीत येईल,जुन्यागावातील बैलजोडी चौकात श्री गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने भव्य स्वागत केल्या जाणार असुन गावात ठिकठिकाणी सडासमार्जन करुन रांगोळ्या काढुन नागरिक स्वागत व पुजन करणार आहेत. खान्देशातील सर्वात जुनी व आषाढी सोहळ्यातील मानाची पहिली पालखी म्हणून आदिशक्ती मुक्ताईची पालखी परिचित आहे. चिखली शहराचे P I देशमुख आणि श्री. कुणाल बोंद्रे यांनी भेट दिली