डोरेमॉन ने जिंकली विद्यार्थ्यांची मने – टांग्यातून आले विद्यार्थी, स्वागताला डोरेमॉन >< आ.जगताप व जि.प. अध्यक्षांची उपस्थिती

0
897
Google search engine
Google search engine

मांजरखेड येथील जि.प. पुर्व माध्य. मराठी व उर्दू शाळेतील शुभारंभ कार्यक्रम

(फोटो – शहेजाद खान) 

चांदूर रेल्वे :-

टप टप घोड्यांचा आवाज, वाजनारे ताशे, भव्य प्रवेशद्वार, रस्त्यांवर रांगोळ्या, भजनी मंडळ, व लहान मुलांचा आवडता डोरेमॉन या सर्वांच्या लगबगिने तालुक्यातील मांजरखेड गांव मंगळवारी सजले होते. निमित्य होते २६ जून शाळा शुभारंभ कार्यक्रमाचा. शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील मांजरखेड येथील जि.प. पुर्व माध्यमिक मराठी व उर्दू शाळेतील नवागत विद्यार्थ्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. यामध्ये सर्वात आकर्षीत असणारा डोरेमॉनचे शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची मने जिंकली.

      विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मतदार संघाचे आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्यासह जि.प. अध्यक्ष नितिन गोंडाने हे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्यासह पं.स. उपसभापती देवीकाताई राठोड़, मांजरखेडचे सरपंच दिलीप गुल्हाने, शाळा समितीचे अरुण कावलकर, हापीसुद्दीन काजी, गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे आदिंची उपस्थित होती. मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या फोटोचे पूजन करुन विद्यार्थ्यांचे गुलाब व झाड देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरणही करण्यात आले. त्यानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते. शिक्षकांनी आपल्या वर्तनीकितुन पूर्ववैभव प्राप्त करावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्यावे असे मनोगत आ. जगताप यांनी व्यक्त केले तर नितिन गोंडाने यांनीही आपल्या भाषणातुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व वृक्षारोपण करुन शाळेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांचा मित्र डोरेमॉनने विद्यार्थांचे यावेळी मनसोक्त मनोरंजन करून त्यांचा आनंद वाढविला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी सदाशिव दाभाडे, मुख्याध्यापक पुष्पराज हुमने, खुर्शीद झा, संजय शेलोकार, संजय मोदी, अनिल भरोशे, माधुरी बूटे, मिना किन्हीकर, सुरेखा नांदगावकर, संगीता आंबटकर, यास्मीन बानो वकार शाह, रिजवान खान, सैयद साबीर, फौजीया तबस्सुन, मौसिन अंसारी, केंद्र प्रमुख शिंगाने, विषय साधन व्यक्ति विवेक राऊत, सभा शेख, मंगेश उल्हे, सतीश मनोहर, श्रीनाथ वानखड़े, वर्षा गादे, अनिल गोंडसे, कल्पना गुडधे अंगनवाडी सेविका आदींनी सहभाग घेतला होता.

गट साधन केंद्राचा पुढाकार 

सर्व जिल्ह्यात शाळा शुभारंभ कार्यक्रम शाळा स्तरावर  साजरा होत असतांना चांदूर रेल्वे पं.स. अंतर्गत येणाऱ्या गट साधन केंद्रातील विषय साधन व्यक्ति यांच्या पुढाकाराने दर वर्षी या शाळा शुभारंभ कार्यक्रमाला भव्य स्वरुप देऊन आगळा वेगळा उपक्रम राबविल्या जाते. गट साधन केंद्राचा संपुर्ण सहभाग यात राहत असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे यांनी सांगितले.