गौरखेडा शिवारात ६५ हजाराची गावठी दारू नष्ट

0
729
चांदूर रेल्वे –
चांदुर रेल्वे जवळील गौरखेडा शिवारात चांदूर रेल्वे पोलीसांनी मंगळवारी पहाटे पाच वाजता धाड टाकून मोहाचा सडवा व दारू भट्टी सह ६५ हजाराची गावठी दारू नष्ट केली. याप्रकरणी बिट्टु पवार (२५) याला अटक करून कलम ६५ (फफड) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.