वैमानिकांना प्रशिक्षण देत असताना लष्कराचे विमान कोसळले

0
2356
Google search engine
Google search engine

नाशिक (उत्तम गिते)

निफाड तालुक्यातील वावी ठुशी शिवारात लष्कराचे लढाऊ विमान कोसळले. वैमानिकांना प्रशिक्षण देत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटना घडली तेव्हा विमानात तीन वैमानिक होते.

प्रसंगावधान दाखवून विमानातील वैमानिकांनी पॅराशुटच्या सहाय्याने उड्या घेतल्याने ते सुखरुप आहेत.  श्री.खैरे यांच्या शेतात आज (बुधवार) सकाळी लष्कराचे एचएएल सुखोई 30 क्रमांक 210 विमान कोसळले. विमान जळून खाक झाले आहेत. या अपघातामुळे द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे.