*जि. प. शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप व नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत*

0
1183
Google search engine
Google search engine

जि. प.महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांचं हस्ते

सिरोंचा :- शहरातील परिवर्तन भवन जवळील सिरोंचा माल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेचा आज पहिला दिवस असल्याने गडचिरोली जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती यांच्या हस्ते नवगत विद्यार्थी रोहन पदमगीरीवार, कु.अक्षरा रादांडी, नागलक्षमी आसाम या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .आणि यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठपुस्तक वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, माजी उपसरपंच रवी सल्लमवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कुम्मरी सडवली, शाळेचे शिक्षक ए.एच.नलमेलवार, बी.आर.कोंडगोर्ला सह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्तित होते.