फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांचे बायबलमधील गोष्टीवरून विधान
मनीला (फिलिपिन्स) – ‘हा मूर्ख ईश्वर कोण आहे’, असे विधान फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांनी केले आहे. त्यांनी बायबलमधील ‘आदम आणि हव्वा यांनी निषिद्ध फळ खाल्ल्यानंतर ते बागेतून बाहेर फेकले गेले’, या गोष्टीवर टीका करत वरील विधान केले, तसेच ख्रिस्त्यांच्या ‘पाप’ या धारणेवरही टीका केली. यामुळे अनेक चर्च आणि नागरिक यांनी दुतेर्ते यांचा निषेध केला आहे. यावर दुतेर्ते यांच्या कार्यालयाने, ‘हे त्यांचे वैयक्तिक विचार होते’, असे स्पष्टीकरण दिले आहे. दुतेर्ते यांनी यापूर्वीही ख्रिस्ती धर्मातील प्रथा आणि परंपरा यांवर टीका केली आहे.
येथील कॅथलिक बिशप आर्तुरो बेस्टेस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना दुतेर्ते यांना वेडे ठरवले आणि त्यांच्यातील हुकूमशाही प्रवृत्तीचा अंत होण्यासाठी लोकांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले.