घाटकोपरमधील सर्वोदय दवाखान्याजवळ चार्टर्ड विमान कोसळलं – 5 जणांचा मृत्यू

0
1415
Google search engine
Google search engine

मुंबई :- घाटकोपरमधील सर्वोदय दवाखान्याजवळ चार्टर्ड विमान कोसळले आहे. विमान कोसळल्यानंतर स्फोटदेखील झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर मोठ-मोठे आगीचे लोळदेखील परिसरात पसरले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेत एका पादचारी व विमानातील चार अशा पाच जणांचा  मृत्यू झाला आहे. या परिसरात मोठा आवाज होऊन आगीचे लोट पसरले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. घाटकोपर पश्चिमेकडील माणिकलाल भागात ही घटना घडली.

 

जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळ बांधकाम सुरु असलेल्या इमारतीनजीक चार्टर्ड विमान कोसळले. भर वस्तीत विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी अग्निशमन दल पोहचले असून, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. पोलिस ही घटनास्थळी पोहचले आहेत.दरम्यान, हे चार्टर्ड विमान उत्तर प्रदेश सरकारने विकलेले असून त्याचे नाव व्हीटी यूपीझेड किंग एअर सी-90 असे आहे. या विमानात पायलटसह चार लोक प्रवास करत होते. यातील सर्वांचा मृत्यू झाला आहे प्राथमिक माहितीही मिळते आहे..