लासलगाव येथील जिजामाता प्राथमिक शाळेत प्लास्टिक बंदी जनजागृती मोहिम संपन्न

0
1783
Google search engine
Google search engine

नाशिक(उत्तम गिते) –

लासलगाव येथील प्राथमिक शाळेत प्लास्टिक बंदी जनजागृती मोहिम राबवण्यात आली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अनिस काजी यांनी प्लास्टिक बंदी अंतर्गत कोणत्या वस्तुंच्या वापरावर बंदी आहे.तसेच कोनत्या प्लास्टिक वस्तु सद्या आपन वापरू शकतो याची सविस्तर माहिती विद्यार्थीना व पालकांना देण्यात आली.पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण सर्व नागरीकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.कमी होत चाललेले पर्जन्यमान हे पर्यावरन असंतुलनाचे कारन आहे.

प्लास्टिक कुजत व सडत नसल्यामुळे ते जमिनीत वर्षनुवर्ष तसेच राहते. त्यामुळे जमिनीत पाणी झिरपत नाही व पर्यायाने पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे.म्हनुन प्लास्टिक बंदी ही काळाची गरज होती.असे प्रतिपादन मुख्याध्यापकांनी केले. प्लास्टिक न वापरन्याची प्रतिज्ञा विद्यार्थी व शिक्षकांनी घेतली.आपली शाळा प्लास्टिकमुक्त करन्याचा संकल्प सर्वांनी केला.शासनाने लागू केलेली प्लास्टीकबंदी
ही जंगले ,नद्या व जलाशयांना मिळालेली “संजीवनी” आहे!
तिचे न कुरकुरता स्वागत करुया!
सवयी बदलुया,देश बदलुया !

प्लास्टिकला पर्याय म्हनुन कागदी व कापडी पिशव्या वापरन्याचे आव्हान सर्वांना करन्यात आले.तसेच शाळेमद्ये इ.4 थी च्या वर्गात कागदी पिशव्या निर्मितीची कार्यशाळा घेन्यात आली.वर्गशिक्षक समीर देवडे यांनी विद्यार्थ्यांना कागदी पिशवी बनविन्याचे प्रात्याक्षिक देवुन. सर्व विद्यार्थ्यांकडुन सुबक, आकर्षक व टिकावु कागदी पिशव्या बनवुन घेतल्या.तसेच विद्यार्थ्यांनी पालक व शेजारील लोकांनादेखील कागदी व कापडी पिशव्या वापरन्याचे आव्हान करन्याविषयी जागृत केले.शाळेच्यावतीने प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती फलक तयार करन्यात आला.सदर कार्यशाळा व जनजागृतीसाठी कैलास भामरे,दिलीप शिरसाठ, सुहास बच्छाव,राजाराम जाधव,योगीराज महाले, केदुबाई गवळी,हर्षदा बच्छाव, बद्रीप्रसाद वाबळे, बाळासाहेब वाजे यांनी नियोजन व परिश्रम घेतले.