चांदूर रेल्वेच्या घरकुल घोटाळ्यात मोठे मासे अडकण्याची शक्यता – चौघांसह मुख्याधिकाऱ्यांवर आहे गुन्हे दाखल

0
1258
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    शहरातील एका मालमत्तेवर दोघांनी खोटे दस्ताऐवज व खोटे शपथपत्र दाखल करून दोन घरकुलाचा लाभ घेतला. या प्रकरणी  मुख्याधिकारी यांच्यासह इतर चौघांवर चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणात मोठे मासे अडकण्याची शक्यता दिसत आहे.
      चांदूर रेल्वे नगर परीषद अंतर्गत येणाऱ्या क्रांती चौक येथील मालमत्ता क्र. ३२१ या पाच व्यक्तींच्या मालकी हक्काच्या जागेवर  दोघांनी खोटे शपथपत्र व खोटे दस्तऐवज दाखल करून दोन घरकुलाचा लाभ घेतला. सदर प्रकरणात अस्तीत्वात असलेल्या ३२१ व अस्तीत्वास नसलेल्या ३२१/१ या मालमत्तेवर घरकुल मंजुर केले. यामध्ये दुसरी विशेष बाब म्हणजे सदर घरकुल झोपडपट्टी वसाहत मधील असुन या घरकुलाचा लाभ शहरात देण्यात आला आहे. शपथपत्रात शहरातील जागा ही शासनाने झोपडपट्टीतील जागेच्या ऐवजी लीज पट्ट्यावर शहरात दिल्याचे नमुद केले असल्याचे फिर्यादी ऐहफाज राराणी यांनी सांगितले. या खोट्या माहितीच्या आधारे घरकुलाचा लाभ घेतला. या प्रकरणात सन २००८ ते २०१८ पर्यंतचे दोषी मुख्याधिकारी अडकणार आहे. त्यामुळे दोषी मुख्याधिकारी एक नसून तीन ते चार असण्याची शक्यता आहे. याशिवाय घरकुल मंजुर करण्याकरीता जबाबदार असलेले नगर परीषदचे अधिकारी, कर्मचारी यांचा सुध्दा समावेश असु शकतो. त्यामुळे आरोपींची संख्या मोठ्या संख्येत वाढणार असल्याचे दिसत आहे. परंतु तपास अधिकारी कोणत्या पध्दतीने तपास करणार यावर सुध्दा प्रकरण काही प्रमाणात अवलंबुन राहणार आहे. या प्रकरणातील शपथपत्रात एका तत्कालीन नगराध्यक्ष यांचा अंगठा मारला असुन सदर नगराध्यक्ष मात्र कोणत्याही कागदपत्रावर सही करत असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. त्यामुळे ही सुध्दा फसवणुक या प्रकरणात झाली असावी. फिर्यादी ऐहफाज रफीक राराणी गेल्या २ वर्षांपासुन सतत या प्रकरणाच्या मागे असुन त्यांनी सर्व खोटे कागदपत्रे गोळा केली आहे. सदर प्रकरणाची तक्रार अहेफाज राराणी यांनी ग्रामिण पोलीस अधिक्षकांकडे केली होती. पोलीस अधिक्षकांनी याची स्थानिक पोलीसांमार्फत चौकशी केली असता सदर घोटाळा झाल्याचे समोर आला आहे. शासनाची फसवणुक करून शासकीय पैशाचा दुरूपयोग केल्यामुळे पाच आरोपींवर कलम १९३, १९९, २००, ४१७, ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        या प्रकरणाची चांदूर रेल्वे पोलीसांनी कसुन चौकशी गेल्यास मोठा उलगडा होण्याची शक्यता असून संबंधित अख्ख्या अधिकाऱ्यांचे रॅकेट हाती लागु शकते. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा कसा तपास करणार व कोणाकोणाच्या मुसक्या आवळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुख्याधिकारी पाटील यांची बदलीचे याच प्रकरणामुळे ? 
यापुर्वीचे मुख्याधिकारी पाटील यांची तडकाफडकी बदली नुकतीच झाली. त्यांच्या तत्काळ बदलीचे कारण समजले नव्हते. परंतु गुन्हा दाखल होण्याच्या पहिले या घरकुलाची चौकशी सीओ पाटील असतांना सुरू होती. त्यामुळे त्यांची याच प्रकरणामुळे तडकाफडकी बदली करण्यात आल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.
घरकुल घोटाळे येणार का पुढे ? 
शहरात घरकुल घोटाळा उघडकीस आणण्यासाठी एक शहरवासी गेल्या १० वर्षांपासुन लढा देत आहे. परंतु सदर एक घरकुल घोटाळा पुढे आला असतांना आरोपी अधिकारी यांची बुडात चौकशी करून अजुनही काही घरकुल घोटाळे पुढे येणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
तपास अधिकाऱ्याशी नाही झाला संपर्क 
या  प्रकरणाबाबत चौकशीची अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस तपास अधिकारी फुलेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमनध्वनी बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.