लुटमार करन मारहाण करणाऱ्यास दत्तवाडी पोलिसांनी केले जेरबंद

0
1321

अनिल चौधरी, पुणे

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मदत मागून फिर्यादी शंकर राठोड (वय 23) यांना मारहाण करून लुटणाऱ्या आरोपी संजय वसंत दळवी रा. पानमळा सिंहगड रोड यास मोठ्या शिताफीने प्रभारी पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ यांनी अटक केली आहे.

याबाबतची सविस्तर हकीकत अशी कि, पुणे शहरातील वारजे ब्रिज जवळ आरोपी संजय दळवी याने तक्रारदार शंकर व्यकंट राठोड रा. गोकुळनगर कात्रज पुणे यांना लिफ्ट मागून शॉर्टकट रस्ता दाखवतो असा बहाणा करुण दळवी याने  फसवून गणेशमळा मोरेश्वर सभागृह येथे आणून त्यांच्या गाडीची चावी काढून घेवून त्यांच्या खिशातील ५००रुपये जबरदस्तीने काढून घेवून त्यांना मारहाण करुण त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून ,चैनचा तुकडा व त्याचा बदाम जबरदस्तीने काढून घेवून शंकर राठोड यांची युनिकोर्न गाडी घेवून पोबारा केला होता. याबबतची तक्रार त्यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये केली होती.

  दत्तवाडी पोलीस स्टेशन तपास पथकातील पो.ना. सुधीर घोट्कुले व पो.शि.क्षीरसागर यांना बातमीदारामार्फत खबर मिळाली कि, आरोपी संजय दळवी हा लक्ष्मीनारायण टाँकीज समोरील फुथपाथवर संशयित रीत्या उभा आहे . सदरच्या माहितीची खात्री करुन वरिष्ठ अधिकारी अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उप-आयुक्त प्रवीण मुंडे तसेच सहा.पो.आ. शिवाजीराव पवार यांना कळवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. अनिल डफळ यांनी आरोपी संजय वसंत दळवी यास अटक केली आहे.