आकोट ग्रामिण पोलिस स्टेशनच्या पुढाकाराने उमरा येथे वृक्षारोपन

0
831
Google search engine
Google search engine

आकोट(प्रतीनिधी) -आकोट ग्रामिण पोलिस स्टेशनच्या पुढाकाराने आज (दि.२) उमरा येथे वृक्षारोपन पार पडले.हरीत पर्यावरणासाठी या कार्यक्रमाला उमरावासीयांनी भरभरुन प्रतीसाद दिला.या वृक्षारोपन कार्यक्रमाला ग्रामिण पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद बहाकर यांच्यासह मान्यवरांनी वृक्षारोपन केले.यावेळी कार्यक्रमाला सरपंच प्रभुदास खवले,पोलिस पाटील विजय खवले,तंटामुक्ती अध्यक्ष सुकोशे,पो.हे.कॉ.पंचबुधे,ना.पो.कॉ.राजेश जौंधारकर,गजानन भगत,मोतीराम गोंडचवर,पो.कॉ.दत्ताञय हुशे,राम भगत,आनिल शिरसाठ,अविनाश आढे,यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक वगावकरी मंडळी हजर होती.