महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक

0
1293
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी, पुणे:-

महावितरण मुंब्रा उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता  धनंजय वसंतराव भोजने वय-५२ यांना तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना  ठाणे अॅन्टी करप्शन ब्युरो चे अधिकारी दीपक बर्गे  व त्यांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी  रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

  याबाबतची सविस्तर हकीकत अशी कि, एका तक्रारदार  इसमाने ज जादा आलेले लाईट बिल कमी करुण देण्यासाठी कार्यकारी अभियंता धनंजय भोजने यांच्या कडे गेले होते , त्यावेळेस तक्रारदार यांच्याकडे महावितरण चे अधिकारी भोजने यांनी जास्त  आलेले लाईट बिल कमी करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली . लाच दिल्याशिवाय आपले लाईट बिल कमी होणार नाही याची खात्री झाल्यानंतर तक्रारदार यांनी ठाणे एसीबी येथे तक्रार नोंदविली . तक्रारदारांनी दिलेल्या लाच मागितली प्रकरणी  ठाणे अॅन्टी करप्शन ब्युरो यांनी तत्काळ पडताळणी  करुण  लोकसेवक भोजने यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबी ठाणे यांनी सापळा लावला. त्यानंतर लोकसेवक धनंजय भोजने  यांना तक्रारदार इसमाकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कडून रंगेहाथ पकडण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दीपक बर्गे एसीबी ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

     जर शासकीय लोकसेवकाने तसेच खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास अॅन्टी करप्शन ब्युरो,  ठाणे किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.