विनयभंग प्रकरणात आरोपीला १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा – न्या. खैरनार यांचा निकाल

0
736
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
स्थानिक प्रथम श्रेणी कोर्टाचे न्यायदंडाधिकारी एस. सी. खैरनार यांनी पिडीतेचा पाठलाग करून विनयभंगाच्या प्रकरणात तालुक्यातील मालखेड येथील आरोपीस एका वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
     तालुक्यातील मालखेड येथील आरोपी अमोल रामभाऊ बागडे (२५) याने पीडीतेचा पाठलाग करून तिचा हाथ धरला होता व विनयभंग केला होता. या प्रकरणात आरोपीवर कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सदर प्रकरण कोर्टात सुरू होते. यामध्ये न्यायाधिश खैरनार यांनी २ जुलै रोजी या प्रकरणाचा निकाल देत आरोपीला न्यायालयाने एक वर्ष सक्त मजुरी व ५ हजार रूपये दंड ठोठावला व दंड न भरल्यास १ महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
      सरकारी वकील म्हणून ए. डब्लु. जुनघरे यांनी तर आरोपीचे वकील म्हणून एल. एम. कदम यांनी काम पाहिले. या प्रकरणाची प्रथम चौकशी एपीआय अंभोरे यांनी व पुढील तपास हे.कॉ. सुरेश बोदडे यांनी केले. कोर्ट पैरवी सुरेंद्र वाकोडे यांनी केली.