राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी गजेंद्र पाचडे यांची नियुक्ती

0
678
Google search engine
Google search engine

अकोट – मागील १८ वर्षापासून सामान्य कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ध्येयधोरणे जपत पक्ष संघटन वाढीसाठी योगदान देणाऱ्या आसेगाव बाजार येथील गजेंद्र पाचडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अकोट तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.

रविवारी अकोल्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, विदर्भ समनव्यक संग्राम गावंडे,रायुकॉ जिल्हा अध्यक्ष ऍड महेश सरप,जेष्ठ नेते संतोष कोरपे,श्रीकांत पिसे पाटील,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गजेंद्र पाचडे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या अगोदरही गजेंद्र पाचडे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस, उपाध्यक्ष,तालुका अध्यक्ष म्हणून प्रभावी कार्य केलेले असून त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.