अकोट शहर पोलिसांनी काही तासातच पकडले दुचाकी चोरटे

0
847

आकोट- अकोट शहर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी आलेल्या एका तक्रारीचा काही तासातच छडा लावत चोरट्यांना जेरबंद केले.पोलिस सुञांनुसार आकोट शहर पोलिस स्टेशन येथे दिनांक 05/07/2018 रोजी फिर्यादी दर्शन नंदकिशोर वानखडे वय 23 रा गजानन नगर अकोट यांची हिरो होंडा स्प्लेंडर सिल्वर रंगाची मोटोर सायकल MH 32 U 3744 की 25000/-रु ची दि 03/07/18 रोजी संध्याकाळी पटेल कॉम्प्लेक्स लाक्कडगंज अकोट येथून कुणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेल्याचा जबानी रिपोर्ट पो स्टे ला दिला.त्यावरुन अप नं 236/2018 कलम 379 भा द वी चा गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी रात्रगस्त बि एम व डी बि पथक मधील कर्मचाऱ्यांना वायलेस वरुन गुन्ह्याबाबत माहिती देवून आरोपी व गाडीचा चा शोध घेण्याचा सुचना दिल्या वरुन रात्र गस्त बि एम 6 वरील पोहेका घायल नापोका राकेश राठी यांना उशीरा रात्री गस्त दरम्यान लोहारी रोडवर दोन इसम गाडी घेवून संशयित रित्या दिसले व त्यांचे जवळील मो. सा. चा रंग व क्रमांक मिळताजुळता दिसल्याने त्यांच्या कडे जात असताना पळून जात असण्याच्या बेतात असताना पकडले त्यांना नाव विचारली असता 1) संतोष दिनकरराव काळे 2) अमोल मधुकरराव वानखडे दोन्ही रा वडाळी देशमुख ता अकोट असे सांगितले वरुन त्यास मो सा व रात्री येण्या बाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली समाधान कारक उत्तरे न दिल्याने त्यास पो स्टे ला मो सा सह आणुन त्यास विचारपुस केली असता त्याने मोटोर सायकल चोरीची कबुली देऊन त्यांच्या कडुन हिरो होंडा स्प्लेंडर MH 32 U 3744 मो सा किंमत 25000/- रु ची जप्त करण्यात आली आहे.पोलिस तपासात आणखी काही माहीती उघड होण्याची शक्यता असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.सदरची कारवाही पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानोबा फड पोहेका संजय घायल राकेश राठी गोपाल अघडते सुलतान पठाण विजय सोळंके यांनी केली.