वाढते अतिक्रमण ठरत आहे डोकेदुखी

Google search engine
Google search engine

चांदुर बाजार येथील वाढत्या अतिक्रमण वर नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष, मोठ्या अपघात होण्याचे सर्वात अधिक शक्यता,
आत्मदहन आंदोलन नंतर अतिक्रमण जैसे थे,

चांदुर बाजार:-

अनेक खेडे गावाला जोडला गेलेला एस ती डेपो ते जयस्थभ रस्ता हा अतिक्रमण यांच्या सापळ्यात अडकला असल्याचे चित्र दिसून येते आहे तर बेलोरा कडे जाणाऱ्या रोड वर व्यावसाहिक हे आपलं दुकानाचा पसारा मांडून बसले आहे.चांदुर बाजार तालुक्याचे ठिकाण अजून ग्रामीण भागातील हजारो लोक या ठिकाणी शासकीय तसेच खाजगी कामा करीत ये-जा करीत असतात.या मध्ये विद्यार्थी वर्ग यांची संख्या अधीक आहे.मात्र माजी बांधकाम सभापती आनंद अहिर यांनी आत्मदहन करण्याच्या इशारा दिल्यानंतर या ठिकाणचे अतिक्रमन कमी करण्यात आले होते मात्र 2 दिवसांनी पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.या वाढत्या अतिक्रमण मुळे मोठा अपघात होणार असल्याचे चित्र दिसून येते आहे.तर पोलीस प्रसासन मधील वाहतूक नियंत्रण करणारे कर्मचारी हे रोडवर लागणाऱ्या नो पार्किंग मधील वाहनावर कार्यवाही का करीत नाही अशा प्रश आहे तर नगर परिष चांदुर बाजार अतिक्रमण धारकावर कार्यवाही कधी करणार हा प्रश्न उभा आहे.

या सर्वांवर चांदुर बाजार नगर परिषद या प्रश्नावर अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.यामुळे नागरिक याना सावत्र पणाची वागणूक मिळत असल्याचे जाणवत असून एस टी डेपो ते पंचायत समिती,त्यानंतर जयस्थभ ते एस टी डेपो,बेलोरा ते वृंदावन कॉलनी या सारख्या रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि अवैध रित्या पार्किंग होत असल्याचे चित्र आहे.या सर्वामुळे मोठा अपघात होण्याची दाट शकत वर्तवली जात आहे.

वाढत्या अतिक्रमण आणि व्यावसायिक यांच्या मनमानी मुळे नागरिकांना आपले वाहने चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे.नगर परिषद हद्दीत येणाऱ्या आणि आपल्या दुकानातील साहित्य रोडवर ठेवणाऱ्या व्यवसाहिक यांच्यावर नगर परिषद कार्यवाही करतील का.?आनीअवैध ठिकाणी वर पार्किंग करणाऱ्या वर पोलीस प्रसासन कधी कार्यवाही करणार हा प्रश आहे.