ईलेक्ट्रीसिटी लाईनस्टाफ असोशिएशनचे वादळ मुंबईत धडकणार – सोमवारी प्रकाशगड येथे एकदिवसीय धरने आंदोलन

0
1108
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके – महावितरण कंपनीमधील महत्वाचा पाया असलेल्या लाईनस्टाफ वर एवढी जबाबदारी असून सूध्दा तो उपेक्षित राहीला त्याच अनुषंगाने ईलेक्ट्रीसिटी लाईनस्टाफ असोशिएशन र नं पी एन 4767ही संघटना लाईनस्टाफ करीता बनलेली एकमेव संघटना आहे याच संघटनेच्या वतीने लाईनस्टाफच्या विविध हक्क व मागण्यांसाठी सबंध महाराष्ट्रभर क्रमबध्द आंदोलन पुकारण्यात आले त्यामध्ये सुरूवातीस दि.5जूलै रोजी महाराष्ट्रातील सर्व विभागीय कार्यालया समोर भव्य द्वारसभा त्यानंतर दिनांक 7जूलै रोजी मंडळ’ परीमंडळ समोर भव्य द्वारसभा घेण्यात आल्या
ईलेक्ट्रीसिटी लाईनस्टाफ असोशिएशन च्या महत्वाच्या मागण्यांमध्ये
लाईनस्टाफला वेतनगट 4मधून वेतनगट 3मध्ये अपलोड करणे;ग्रामीण भागातील लाईनस्टाफ कर्मचारी यांचे कामाचे 8तास निश्चित करणे, प्रशासनाच्या बदली धोरणातील मनमानी कारभार बंद करावा;’पेट्रोल भत्ता 20 लिटर देण्यात यावा; सूरक्षा साधनांकरीता ठोस उपाययोजना करण्यात यावी; विद्युतसहाय्यक यांची पगारातील मेडीक्लेमच्या नावाखाली 500रू. कपात बंद करून व झालेली कपात परत देण्यात यावी;स्टाफ सेट अप मध्ये लाईनस्टाफ कर्मचारी यांची कपात न करता गाव तिथे लाईनस्टाफ ही संकल्पना राबविण्यात यांवी या व इतर मागण्यांसाठी दिनांक 9जूलै रोजी ईलेक्ट्रीसिटी लाईनस्टाफ असोशिएशनचे वतीने केंन्द्रिय मार्गदर्शक मा. विष्णुस्वरूप पाटील,केंन्द्रिय अध्यक्ष मा. प्रशांत लबडे पाटील, केंन्द्रिय सरचिटणीस मा राजुअलि मुल्ला ; उपसरचिटणीस रामरावजी डाखोरे; उपाध्यक्ष पृथ्वीराज रामटेके;बब्रुवान गूराळे, संघटक सुनिल माने; शेख मोईज नागपूर प्रादेशिक विभाग कार्यकारीणी चे पन्नालाल रंगारी, धनराज हिवरे पाटील, रमेश वाटकर व सर्व महाराष्ट्रातील झोण सर्कल विभाग,उपविभागीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत 9जूलै सोमवारी मुंबई स्थित महावितरणचे मूख्य कार्यालय प्रकाशगड बांद्रा येथे संघटनेच्या वतीने भव्य धरने आंदोलन सकाळी 10वाजता आयोजित केले आहे तरी मलकापूर विभाग मधील लाईनस्टाफ यांनी मुंबई येथील धरने आंदोलनास हजर रहाण्याचे अकोट येथील संघटनेचे वरीष्ठ पदाधिकारी नागपुर प्रादेशिक विभाग कार्यकारीणी चे कार्याध्यक्ष धनराज हिवरे पाटील व अकोट विभाग कार्यकारीणी चे अध्यक्ष सूशिल रोही व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे