जननी मोहिमेची यशस्वी नियोजनासाठी अकोट येथे बैठक संपन्न

0
974
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके- अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कला सागर ह्यांचे आदेशाने व अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर ह्यांचे मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यात महिला सक्षमीकरणा साठी व महिला मध्ये जागृती निर्माण करण्या साठी जननी 2 ह्या मोहिमे अंतर्गत12 ते 22 जुलै दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे, ह्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्या साठी दिनांक 6।7।18 रोजी पोलिस स्टेशन अकोट शहर च्या सावली सभागृहात शहरातील विविध संघटनांच्या महिलांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती सदर मीटिंग मध्ये कार्यक्रमाची आखणी करण्याच्या दृष्टीने उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांनी मार्गदर्शन केले, सदर मीटिंग ला शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके, ग्रामीण पोलिस निरीक्षक मिलिंद बहाकार, सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर, पोलिस उपनिरीक्षक शरद माळी, महिला पोलिस उपनिरीक्षक पाटेखेडे, शिवसेना जिल्हा संघटक माया ताई म्हैसने, भूमी फौंडेशन च्या चंचल पितांबेरवाले, JCI अकोट च्या सुनीता चायल, स्नेहल अभ्यंकर, वॉकएथॉन अकोट च्या भैरवी हिंगणकर तसेच महिला कर्मचारी उपस्थित होत्या