गाडगेबाबा मार्केटमध्ये रस्त्याची दुरावस्था – काही भागात राहते पाणी साचुन न. प. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

0
1339
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
शहरातील गाडगेबाबा मार्केटमध्ये रस्त्याची दुरावस्था झाली असुन पावसाचे पाणी सुध्दा या भागात साचत आहे. यामुळे नागरीकांचे हाल होत असुन प्रशासनाने त्वरीत याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
स्थानिक नगर परीषदअंतर्गत येत असलेल्या गाडगेबाबा मार्केटमध्ये समोरील भागातील रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. काही प्रमाणात खड्डे असल्यामुळे प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी बारीक चुरी पावडर टाकला होता. परंतु धुव्वाधार पाऊस येताच याचा उलट परिणाम झाला आहे. याच रस्त्यावर पहिलेपेक्षा जास्त खड्डे आता निर्माण झाले असून पाणी यामध्ये पाणी साचुन राहते. त्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच याच भागातील कावलकर सलून व अक्सा रेडीअम समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून प्रत्येक पावसाच्या वेळी या दुकानांसमोर नदीसारखी परीस्थिती निर्माण होत आहे. सदर पाणीकरीता एक कच्ची नाली बनवून उतार काढण्यात आला होता. मात्र कालांतराने याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही परीस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर परीषद प्रशासनाने त्वरीत याकडे लक्ष देऊन नागरीकांना होणाऱ्या त्रासापासुन मुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे.