मंदिर सरकारीकरणाविषयी विधीमंडळात भूमिका मांडू ! – एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री

0
1200
Google search engine
Google search engine

 

नागपूर– यापूर्वी हिंदूंची मंदिरे तोडण्याच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरली होती. मंदिर सरकारीकरणाविषयीची तुमच्याकडे जी कागदपत्रे असतील, ती आम्हाला द्या. शिवसेनेच्या अन्य आमदारांशी चर्चा करून याविषयीची भूमिका आम्ही विधीमंडळात मांडू, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या ठिकाणी शिवसेना पक्ष कार्यालयात श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना श्री शनैश्‍वर मंदिराच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करण्याविषयीचे निवेदन दिले. या वेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले.