*अखिल भारतीय विधार्थी परिषद शाखा: अचलपुर-परतवाडा द्वारा आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी दिवस संपन्न*

0
951

अचलपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 9 जुलै स्थापना दिन हा सर्वत्र विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केल्या जातो यानिमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते.याच अनुशंगाने अभाविप अचलपूर परतवाडा शाखेने गितगायन स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेऊन विद्यार्थी दिन साजरा केला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अचलपूर-परतवाडा यांचे तर्फे स्थानिक जगदंब देवी संस्थान येथे आयोजित विद्यार्थी दिनाच्या उदघाटन प्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक प्रमोद गारोडे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद नैकेले व प्रमुख अतीथी नंदकिशोर काकडे यांचे हस्ते दिपप्रज्वलन व पुजन करण्यात आले प्रास्ताविक नंदकिशोर काकडे यांनी करतांना अभाविपचा परिचय करून दिला उदघाटक प्रमोद गारोडे यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करने ही एक कौतुकास्पद बाब असल्याचे स्पष्टकरीत अभाविप च्या उपक्रमाचे अभीनंदन केले.

तर गीतगायन स्पर्धेत 24 स्पर्धकांनी सहभाग घेउन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे उदघाटन रमाकांतजी शेरेकार यांनी केले. कार्यक्रमात 22 गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. गीतगायन स्पर्धेचे बक्षीस वीतरण रमाकांत शेरेकार,नगरसेविका अक्षराताई लहाने,जिल्हा संयोजक श्रीराम बालेकर व प्रमोद नैकेले यांच्या हस्ते देण्यात आले यामध्ये
अनिलकुमार रतनलाल केजड़ीवाल यांचेकडून प्रथम पारितोषिक विशाल ब्रम्हकर,सतिशकुमार व्यास यांचेकडून द्वितीय पारितोषिक सिद्धार्थ मोहोड,
निशिकांत दुरानी यांचेकडून तृतीय पारितोषिक
सृष्टि खडसे यांना तर विशेष सहकार्य श्रीकृष्ण फर्निचरचे तुषार खेरडे,स्नेह बुक डेपो,नगरसेविका अक्षराताई रूपेश लहाने तसेच अस्तीत्व मंच अचलपूर यांचे लाभले.गितगायन स्पर्धेचे परिक्षण रतन तडवीसर,बुंदेले मँडम व अँड.टालेसर यांनी केले.उद्घाटन व बक्षीस वितरणाचे संचालन सुषमा गोबाडे, गितगायन स्पर्धा कल्याणी बहोरिया, वैष्णवी बारस्कर, गीत हरीश चव्हाण आभार प्रदर्शन तेजस शेरकार यांनी केले.कार्यक्रमाला पुर्णवेळ कार्यकर्ता विठ्ठल बकाल,आशीष राठौर,गौरव मेहरे,पं.गजानन शर्मा,जितेश मिरगे, शुभम काकडे,हरीश चव्हाण,दीपक सोनोने,तेजस शेरकार,किरण भोंडे,पवन गझघाटे,राज वाडेकर,मनीष टेहरे,आदित्य ठाकरे,गौरव अटालकर,श्याम साऊरकर व बहुसंख्य पालक व नागरिक उपस्थित होते.