समाजकार्याच्या नावाखाली शोषण ?

0
1234
Google search engine
Google search engine
 
ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कथित सेवाकार्याचा बुरखाफाड करणारी एक अत्यंत गंभीर घटना गेल्या आठवड्यात समोर आली. तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या झारखंड येथील संस्थेत कार्य करणार्‍या दोन नन नवजात बालकांची विक्री करत होत्या. या प्रकरणी एका दांपत्याने तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आणि मानवी तस्करीचा प्रकार करणार्‍या २ मिशनरी महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हे प्रकरण केवळ एका अर्भकापुरते मर्यादित नाही, तर शेकडो आणि कदाचित सहस्रो बालकांशी हा विषय निगडित आहे. वर्ष २०१५ ते २०१८ या काळात मिशनरी संस्थेच्या सेवाघरांमध्ये ४५० गर्भवती महिलांची प्रसूती झाली; मात्र त्यांपैकी केवळ १७० जणांची माहिती संस्थेकडे आहे, तर उरलेल्या २८० बालकांच्या नोंदीच संस्थेकडे नाहीत. जर ३ वर्षांतल्या नोंदींमध्ये एवढी तफावत असेल, तर संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या ६८ वर्षांमध्ये किती मानवी जीवांशी खेळ केला गेला असेल ! अशा मुलांचा वापर करून देशविघातक कारवाया केल्या जाणार्‍या नाहीत, चर्चच्या दावणीला ही मुले बांधली जाणार नाहीत, याची शाश्‍वती काय ?  
 
अशुद्ध हेतू !
 मिशनरी तेरेसा यांचा सेवाकार्य हा उद्देश कधीच नव्हता. सेवेच्या नावाखाली त्यांना गरीब हिंदूंचे धर्मांतर करायचे होते. गरीब हिंदूंना वैद्यकीय साहाय्य करण्यापेक्षाही त्यांना तडफडत ठेवण्यात त्यांना रस होता. हे आरोप केवळ हिंदुत्वनिष्ठांनी नाही, तर ब्रिटनचे खिस्तोफर हिचेन्स, रॉबिन फॉक्स, तसेच कॅनडाचे काही संशोधक यांनीही केले आहेत. केवळ आरोप नाही, तर त्याचे दाखलेही संशोधकांनी त्यांच्या लिखाणात लिहून ठेवले आहेत. संपूर्ण भारत खिस्तमय करण्याचे तेरेसांचे स्वप्न होते. त्यासाठी विदेशातून बक्कळ पैसा येत असे. जे हिंदू धर्मांतर करायला सिद्ध होत असत, अशांचीच काय ती (थोडीशी) देखभाल केली जात असे. जर तेरेसा यांना प्रामाणिकपणे कार्य करायचे असते, तर त्यांनी निकृष्ट दर्जाची औषधे, निर्जंतुकीकरण न केलेल्या सुया रुग्णांसाठी वापरूच दिल्या नसत्या. अशुद्ध हेतूने कार्यरत असलेल्या तेरेसांना ‘मदर’ म्हणणे, त्यांना संतपद बहाल करणे, हीच एक अंधश्रद्धा आहे. झारखंड येथील प्रकरणाच्या निमित्ताने ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’च्या शाखांची तपासणी केल्यास अजून काळे धंदे समोर येऊ शकतील. 
 
चर्च आणि शोषण !
चर्च, नन आणि लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण हाही एक संशयाचा विषय आहे. प्रत्येक आठवड्यात किमान एक तरी अशी घटना उघडकीला येते. नुकतेच ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेडचे आर्चबिशप फिलिप विल्सन यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने १ वर्षाची शिक्षा सुनावली. गेल्या आठवड्यात केरळमधील ऑर्थोडॉक्स चर्चच्या चार धर्मोपदेशकांना एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. पीडित महिलेने ‘कन्फेशन’ म्हणून चर्चमध्ये तिच्याकडून झालेल्या पापांचे कथन केले; मात्र  धर्मोपदेशकांनी त्याचा उपयोग करून तिला ‘ब्लॅकमेल’ केले आणि तिचा वापर करून घेतला. गेल्या वर्षी लहान मुलांच्या शोषणाच्या विरोधात भाषणे देणार्‍या फादर रॉबिन वड्डाकुंचिर्यिल याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. 
 
आर्थिक घोटाळ्यांच्या मालिका !
गिरिजाघरांना मिळणार्‍या देणग्या हाही गौडबंगालाचा विषय आहे. दक्षिण भारतातील चर्चच्या आर्थिक अनियमिततेविषयी अनेक वेळा प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी उच्चस्तरीय अन्वेषण यंत्रणांकडून चौकशी चालू आहे. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये गरीब, आदिवासी हिंदूंचे धर्मांतर करून ख्रिस्त्यांनी अख्खी राज्ये ख्रिस्तीबहुल केली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात ज्या घराण्याने भारतावर राज्य केले, त्या घरच्या सूनबाईंमुळेच चर्चच्या कारवायांना ‘सोनिया’चे दिवस आल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे बलात्कार, लैंगिक शोषण, आर्थिक घोटाळे यांसारख्या घटना घडूनही सर्वपक्षीय सरकारांनी कधी चर्चच्या कारभारांत नियमितता येण्यासाठी त्यांचे सरकारीकरण करण्याचा विचार केला नाही.
 
सेवाकार्याच्या नावाखाली चाललेले कार्य, सरकारी अनास्था, हिंदूंच्या धर्मशिक्षणाचा अभाव याचा परिपाक म्हणून ख्रिस्ती मिशनर्‍यांचे जाळे भारतात फोफावले आणि या जाळ्यात गरीब हिंदू अलगद फसले. दया, प्रेम, करुणा, शांती अशा शब्दांची चर्चच्या धर्मोपदेशकांकडून पेरणी होत असली, तरी त्यांचे वर्तन मात्र या शब्दांच्या अक्षरशः उलट आहे. हे जाणून हिंदूंनी अशांपासून चार हात दूर रहाणे शहाणपणाचे आहे.

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.
संपर्क : 7775858387