रानडुक्कराच्या हल्यात कुटासा येथील शेतमजुर गंभीर जखमी

0
979
Google search engine
Google search engine

आकोट : तालुक्यातील ग्राम कुटासा येथील शेतमजुरी करणारे गजानन रामाजी वाळसे वय ५५ हे आज सकाळी मंगेश देशमुख यांच्या शेतात सरकी चे खाडे लावण्याकरिता गेले असताना अचानक शेतातील रानडुकराने त्यांच्या वर हल्ला चढविला. त्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हि जखम एवढी मोठी होती की त्यांना कुटासा येथील खासगी रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले. त्याप्रसंगी शेतमालक मंगेश देशमुख, अमोल भगत ,उमेश सपकाळ, अशोक झामरे यांनी सहकार्य केले मात्र वारंवार होणाऱ्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या कडे वनविभागाने वेळीस लक्ष देणे गरचे आहे.रानडुकारांच्या वाढत्या हल्ल्यांनी शेतकरी तथा शेतमजुर भयभीत होत आहेत.