चांदूर रेल्वे तालुक्यात ९६ टक्के पेरण्या पूर्ण – सोयाबीनची पेरणी अधिक तालुक्यात २५३ मि.ली. पावसाची नोंद

0
892
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
     चांदूर रेल्वे तालुक्यात ९६ टक्के पेरण्या पुर्ण झाल्या असून सर्वाधिक २५३१५ हेक्टर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.
     चांदूर रेल्वेत तालुक्यात मंगळवारपर्यंत २५३.५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खरीप पिकाच्या ९६ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी पी. एन. खोबरखेडे यांच्याकडून देण्यात आली. चांदूर रेल्वे तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ४२५६१ हेक्टर असल्याची नोंद आहे. आजपर्यंत तालुक्यात कापूस ६२१८ हेक्टर, सोयाबीन २५३१५ हेक्टर, मूंग ४१० हेक्टर, उडीद ३९० हेक्टर, तूर ६९२० हेक्टर, ज्वारी ८०, मका ९० हेक्टर, इतर पीके ३६० हेक्टर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागात करण्यात आली. पाऊस पिकाला पोषक असला तरी २१ शेतकऱ्यांची खरीप पेरणीची मोढ आल्याची तक्रार कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. सोमवारपासून पावसाची रिमझिम सुरू असून ३५ मि.ली. पावसाची नोंद असल्याची माहिती आहे.  चांदूर रेल्वे तालुक्यात मुसळधार पाऊस अद्यापही बरसला नसला तरी पाण्याची रिमझिम सुरू असल्याने खरीप पिकाची स्थिती उत्तम आहे.