आकोट शहरातील बोगस डॉक्टर निखिल गांधी विरुद्ध अखेर गुन्हा दाखल

0
1420
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके – स्वतः जवळ कोणतीही वैध वैद्यकीय पदवी व वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसतांना गरजू रुग्णाच्या जीवाशी खेळणारा बोगस डॉक्टर निखिल नंदकिशोर गांधी ह्यांचेवर अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पोलीस सुञांनुसार अकोट शहराच्या नामांकित डॉक्टरांकडे स्वतः जवळ कोणतीही वैध वैद्यकीय शिक्षण किंवा पदवी नसतांना तसेच वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना मागील 3 ते 4 वर्षा पासून निखिल नंदकिशोर गांधी हा अधिकृत व उघडपणे स्वतः ला उच्च पदवीधर भासवून रुग्णावर उपचार करीत होता.शहरातील दोन मोठ्या डॉक्टरांकडे ही त्याने बेकायदा रुग्ण तपासणी केली.एवढेच नव्हे तर या बोगस डॉक्टर ने नागपूर, वर्धा इत्यादी ठिकाणच्या नामांकीत रुग्णालयांमध्ये सुद्धा वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली होती,माञ अकोट च्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या एकमेकां विरूद्धच्या स्पर्धेमधून या बोगस डॉक्टरचे बिंग फुटले अन व्यावसायीक स्पर्धेतुन ह्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांचे कडे केल्या नंतर त्यांनी तीन डॉक्टरांचे एक पथक तपासणी साठी सिटी केयर हॉस्पिटल अकोट येथे पाठवले होते.या पथकाने तपासणी केली असता निखिल नंदकिशोर गांधी ह्याचे कडे वैध वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र व वैध वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना मागितला असता सदर डॉक्टर अकोट शहरातून गायब झाला .तो आज पर्यत हा डॉक्टर अकोट मध्ये आलाच नाही, ही तपासणी करून बराच कालावधी लोटूनही कोणतीच कार्यवाही न झाल्या मूळे अकोट मधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्याच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या परंतु कार्यवाही झाली नाही .दरम्यान सिटी केयर हॉस्पिटल च्या डॉक्टर श्याम केला ह्यांनी पोलीस स्टेशन अकोट शहर येथे निखिल गांधी ह्यांनी स्वतः स डॉक्टर असल्याचे भासवून त्यांची फसवणूक करून त्याचे कडे वैद्यकीय परवाना बाबत विचारपूस केली असता त्यांचे वडिलांचा परवाना दाखवून खोटा दस्तऐवज खरा आहे असे भासविले. व त्यांचे कडून त्यांचे सिटी केयर हॉस्पिटल मध्ये एक खोली घेऊन तेथे रुग्णांची तपासणी करून फसवणूक केली अश्या आशयाची तक्रार प्राप्त होताच पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्वरित सदर तक्रारीची सखोल पडताळणी केली.त्यात तथ्य आढळल्याने निखिल नंदकिशोर गांधी ह्याचे विरुद्ध कलम 406,420,468,471 व महाराष्ट्र वैद्यकीय वयवसाय अधिनियम चे कलम 33 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल केला, शहरातील एक मोठा डॉक्टर आधीच गंभिर गुन्हे दाखल झाले असतांनाच ह्यांनंतर परत एका बोगस डॉक्टर वर गुन्हा दाखल झाल्याने शहराच्या वैद्यकीय व्यवसायिका मध्ये खळबळ उडाली आहे, नमूद बोगस डॉक्टर एवढ्या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करीत असताना कोणाच्याही नजरेस तो बोगस डॉक्टर आहे हे येऊ नये ह्या बाबत अकोट शहरवाशी आश्चर्य व्यक्त करीत आहे , ह्या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहे, अकोट शहर पोलिसांच्या ह्या कारवाई मूळे शहरात वेद्यकीय क्षेञासह सामान्य जनामध्ये खळबळ उडाली आहे.