(म्हणे) ‘सनातन संस्थेसारख्या गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे !’

0
1170

यातून काँग्रेसच्या आमदारांचा सनातनद्वेषच दिसून येतो ! विधान परिषदेत चर्चेचा विषय सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांची सनातन आणि हिंदुत्व यांविषयी गरळओक !

नागपूर– डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या आहेत, याचा सरकारने विचार केला पाहिजे. सनातनसारख्या संस्थेवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत, तरीसुद्धा या गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे, असे सनातन आणि हिंदुद्वेषी उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सौ. विद्या चव्हाण यांनी काढले. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे मुले पळवणारी टोळी समजून ग्रामस्थांनी ५ जणांची मारहाण करून हत्या केली. याविषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा चालू असतांना आमदार सौ. चव्हाण यांनी चर्चा सोडून हिंदुत्वनिष्ठांना आक्रमक ठरवण्याचा प्रयत्न केला.

या वेळी आमदार सौ. विद्या चव्हाण म्हणाल्या, ‘‘बाबरी मशीद पाडल्यापासून या झुंडशाहीच्या गुंडांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. गोमांस बाळगल्याच्या कारणावरून उत्तरप्रदेश येथे महंमद अखलाक याची हत्या करण्यात आली. धुळे शहरात ६ जानेवारी २०१३ मध्ये हॉटेलच्या देयकाच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या दंगलीमध्ये ६ मुसलमान युवकांची हत्या करण्यात आली. त्या वेळेच्या आमच्या सरकारने त्यांना घोषित केलेला प्रत्येकी ५ लाख रुपयांचा साहाय्यनिधी ते मुसलमान असल्यामुळे अद्याप देण्यात आलेला नाहीत. गोहत्या, लव्ह जिहाद यांविषयी अफवा पसरवून हत्या चालू आहेत. भिडे यांच्यावर कारवाई न करणे, हा राज्यातील सर्व जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मोठ्या विश्‍वासाने मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसवले आहे, त्यांचा विश्‍वास डळमळतांना दिसत आहे. सरकारचे गुन्हेगारांवर नियंत्रण नाही.’’