लग्न समारंभात आंब्याचे रोपटे देवुन केला सत्कार :डांगे – दबडे परिवाराकडून नाविण्यपुर्ण उपक्रम!!

0
1376
Google search engine
Google search engine

कडेगांव / हेमंत व्यास :-

कडेगांव येथे कै.बाबुराव गोविंद डांगे आण्णा व पांडुरंग गोविंद डांगे बापु यांची नात व रविंद्र बाबुराव डांगे यांची कन्या कु.रंजीता हिचा विवाह राज मल्टीपर्पज हॉलमध्ये नुकताच पार पडला.या विवाह शुभदिनी शुभमुहुर्तावर केला जाणारा मान पान खर्च हार,फेटा,श्रीफळ,खर्चाला फाटा देत गावातील गरीब होतकरू व हुशार विद्यार्थिनिंना पुढील शिक्षणासाठी मदत व्हावी तसेच कु.रजनीच्या विवाहाची व डांगे परिवाराची आठवण म्हणुन एस एससी परिक्षेत कडेगांव केंद्रात ९८.४०टक्के गुण मिळवुन द्वितीय क्रमांक पटकावल्या बद्दल कु.प्रज्ञा शेखर देशपांडे व ईयत्ता ९वीत ९४टक्के गुण मिळविलेली कु.गायत्री श्रीकांत देसाई या दोन विद्यार्थिनिंना संतोष डांगे परिवारांकडून रोख रूपये २५००/व आंब्याचे रोप देवुन सन्मान करण्यात आला.

हा उपक्रम तनिष्का ग्रुप,मैत्र प्रतिष्ठान,छ.शिवाजी गणेश मंडळ,छ.शिवाजी चौक मित्र परिवार व संतोष डांगे परिवार यांनी राबविला.या विवाह समारंभास सयाजीराव देशमुख आबा माजी जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष दत्तुशेठ सुर्यवंशी कडेगांवचे जेष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, सतीश देशमुख युवा नेते धनंजय देशमुख जि.प.सदस्या अॅड.शांता कनुंजे,रेश्मा साळुंखे,पचायत समिती सभापती मंदाताई करांडे यांनी वधुवरास शुभाशिर्वाद दिले.
लग्न समारंभ म्हणले की मान पान आला त्यासाठी मग अनेक समारंभात लाखो रूपये खर्च केले जातात या शुभमुहूर्तावर केला जाणारा खर्च बाजुला ठेवुन वाढत चाललेल्या पर्यावरणाच्या समस्येवर उपाय म्हणुन व सामाजिक बांधिलकी म्हणून दत्त नागरी पत संस्थेचे माजी चेअरमन संतोष डांगे यांनी व त्यांच्या परिवारानी वऱ्हाडी व मान्यवरांचा आंब्याचे रोप देवुन सत्कार करण्यात आला.संतोष डांगे म्हणाले की डांगे परिवारातील कु.रजनीच्या लग्न सोहळ्याची व आमच्या परिवाराची आठवण म्हणुन आंब्याचे रोपटे देवुन सत्कार केला आहे.त्या झाडांची जोपासना करणे आवश्यक आहे असे आवाहन केले.पारंपारिक खर्चाला फाटा देत लग्नसमारंभात केलेल्या या उपक्रमाचे कौतुक कडेगांव नगरीत होत आहे.यावेळी विजय गायकवाड, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, वसंतराव गायकवाड, राजाराम डांगे,पै.अमोल डांगे, योगेश डांगे महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुल्ला ऐन ए मॅडम,सौ.संजिवनी डांगे परिवारातील सदस्य उपस्थित होते.तनिष्का ग्रुप,मैत्र प्रतिष्ठान,छ.शिवाजी चौक मित्र परिवार व छत्रपती शिवाजी गणेश मंडळातील सर्व सभासदांचे या सोहळ्यास मोलाचे सहकार्य लाभले.