प्रहारच्या प्रयत्नास यश वडनेरगंगाई आरोग्य उपकेंद्रात डॉ हर्षदा तायडे यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती.

486

डॉ हर्षदा तायडे वैद्यकीय अधिकारी यांनी वडनेरगंगाई येथील ग्रामस्थांना दिली रुग्णसेवेची ग्वाही .

प्रतिनिधी / दर्यापुर

तालुक्यातील वडनेरगंगाई येथील एँलोपँथी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी जुलै २०१५ पासून उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती.आरोग्य प्रशासनाकडून रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी दुर्लक्ष होत असून आरोग्य सेवा मिळत नसल्यामुळे वडनेरगंगाई येथील ग्रामस्थांना रुग्णसेवेपासून वंचित राहून अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. करिता आरोग्य विभागाकडे लक्ष वेधन्याकरीता तालुका आरोग्य अधिकारी दर्यापुर कार्यालयात कोणत्याही क्षणी प्रहारच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप वडतकर यांच्या सह प्रदिप चौधरी व ग्रामस्थांनी दिला आंदोलन होता.आंदोलन होण्यापुर्विच प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षदा तायडे यांची नियुक्ती केली. त्या दवाखान्यात रुजू होताच प्रहारचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी डॉ हर्षदा तायडे त्यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी बोलतांना त्यांनी गावातील ग्रामस्थांना व रुग्णांना सेवा देण्याची ग्वाही सुध्दा दिली. सत्कार करतांना प्रहारचे शाखा प्रमुख गणेश लाखे, आकाश घाटोळे, सचिन लोरे,सुभाष इंगळे ,पप्पू कोंडे,राहूल ढिवर,मंगेश यादव, सुनिल गौरकार, सचिन गोटे ,गोलू काळे ,राहूल पांडे,शुभम सातपुते, संतोष कातरे आदीची उपस्थिती होती.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।