रयत बॅक कर्मचारी वेतन कराराचा प्रश्न सुटल्याने सेवक समाधानी :-चेअरमन बाबासाहेब शेख.

0
1100
Google search engine
Google search engine

सांगली /कडेगांव/:हेमंत व्यास!!

दि रयत सेवक को आॅपरेटिव्ह बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या कराराची मुदत दि.३१/१२/२०१५रोजी संपलेली होती त्यामुळे गेली दोन वर्ष सेवकांच्या वेतन कराराची चर्चा सुरू होती बॅंक व्यवस्थापन व बॅंक एम्प्लॉईज युनियन यांचे सामंजस्यातुन सन्माननिय समझोता होवुन बॅंक सेवकांच्या सध्याच्या पगारात ७ टक्के वाढ देवुन बॅंकेचे चेअरमन बाबासाहेब शेख,व्हाईस चेअरमन प्रमोद कोळी व सर्व संचालक व बॅक एम्प्लॉईज युनियन कोल्हापूर चे जनरल सेक्रेटरी एन.एस.मिरजकर,सेक्रेटरी पी.डी.जाधव यांचे उपस्थितीत वेतन करार करणेत आला.हा वेतन करार करत असताना सेवकांचे इतर अलौन्सेस वाढविणेत आलेले असुन सेवकांच्या पगारात भरघोस वाढ झालेली आहे.बॅकेचे मुख्यकार्यालय व २०शाखामधील १३१ सेवकांनी दिर्घकाळ प्रलंबित असलेला वेतन करार झाल्याने आनंद व्यक्त केला.बॅक एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष अतुल दिघे तसेच बॅक सेवक युनिट सातारचे अध्यक्ष राजेखाॅ पठाण यांनी बॅंकेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.हा वेतन करार समझोता होण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील साहेब,पार्लमेंटरी बोर्ड व संस्थेचे सचिव प्रि.डाॅ.भाऊसाहेब कराळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी बॅकेचे विद्यमान चेअरमन बाबासाहेब शेख यांना बॅंक सेवकांचा दिर्घकाळ प्रलंबित असलेला वेतन कराराचा प्रश्न चर्चेतुन व समझोत्याने सोडविण्यात यश आल्याबद्दल समाधान व्यक्त केले.तसेच बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी आता बॅकेच्या सर्वांगीण प्रगतीत अधिक जोमाने व धडाडीने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
बॅंक व्यवस्थापनाच्या वतीने बॅंकेचे चेअरमन बाबासाहेब शेख व्हाईस चेअरमन प्रमोद कोळी, संचालक डॉ.विजय कुंभार,शहाजी मखरे,जंबुकुमार आडमुठे, लालासाहेब खलाटे, पंढरीनाथ बारवे, विजयकुमार डुरे, पोपटराव पवार, सुखदेव काळे, रामदास तांबे,अर्जुन मलगुंडे,सुभाष पाटील,राजेंद्र शिंदे,डाॅ.बिरू राजगे,सौ.निलीमा कदम,सौ.सुनिता वाबळे,व जनरल मॅनेजर संजयकुमार मगदुम, बॅंक एम्प्लॉईज युनियन कोल्हापूरच्या वतीने जनरल सेक्रेटरी नारायण मिरजकर,सेक्रेटरी पी.डी.जाधव, बॅंक कर्मचारी प्रतिनिधी म्हणुन सेवक युनिट चे अध्यक्ष राजेखाॅ पठाण, पांडुरंग घाटगे,दत्तात्रय काकडे, विनायक देसाई,चंद्रकांत बनकर, अरविंद सालमुठे,किरण नलावडे इत्यादी मान्यवरांनी करारावर सह्या केल्या आहेत.यावेळी रयत सेवक बॅंक पदाधिकारी व सेवक उपस्थित होते.