शिरजगाव बंड ग्रामपंचायत आरोग्यास हानिकारक ठरत आहे प्लास्टिक

0
1707
Google search engine
Google search engine

बंदी असून सुद्धा शिरजगाव बंड परिसर प्लॅस्टिक कचऱ्याच्या विळख्यात
ग्रामविकास अधिकारी शिरजगाव बंड यांचे संभ्रमात ,सर्वसामान्य नागरिकाच्या आरोग्य चि काळजी नाही

चांदुर बाजार :-शशिकांत निचत (विशेष प्रतिनिधी)

शिरजगावबड ग्रामपंचायत परिसरात चादुरबाजार ते ब्राम्हणवाडा थडि रोडवर मंगल कार्यालय आहेत.त्याच्या परिसरात विविध वस्तू च्या प्याकींगसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिकचे वेस्टन व प्लॅस्टिक पिशव्या या आज सर्वात मोठी डोकेदुखिचि बाब ठरलि आहे. प्लॅस्टिक हा पर्यावरणाला व आरोग्यला घातक ठरणारा सर्वात मोठा घटक ठरला आहे.त्यामुळे राज्य सरकार ने त्यावर बंदी घातली होती.

शिरजगाव बंड ग्रामपंचायत कार्यालय हद्दीत येणाऱ्या ब्राम्हणवाडा थडी रोडवर असणाऱ्या मंगल कार्यालया समोरुन दररोज सकाळी शेकडो नागरिक माँनिग वाँक करतात ,परंतु रस्तावर प्लास्टिक, शिळे अऱ्न्न तेथिलच खुल्या जागेवर टाकल्यामुळे परिसरातिल रत्यावर अत्यंत दुर्गंधी पसरली आहे.
आज प्रत्येक वस्तुला प्लास्टिकचे वेस्टर्न वापरले जात आहे, तसेच प्लास्टिकचे ग्लास थर्माकोल च्या पत्रावळि ,तसेच गुटखा, खराँ पुड्यासुद्धा त्यात समावेश आहे कापडी पिशव्या ऐवजी सरांसप्लास्टिक पिशव्याचा वापर होत आहे. त्यामुळे रस्त्यावर प्लास्टिक कचऱ्याचे ढिगारे व तेथुन उडनारा कचरा शहर व गावाना बकाल स्थितीत आणत आहे.

हा कचरा मोकळ्या जागेत किंवा रस्तावर फेकला जातो त्याचे विघटन होत नसल्याने हवे मार्फत हा कचरा सर्वत्र पसरतो तोच कचरा नाल्या,गटारे यामध्ये साचतो परिणामी नाल्या गटारे याचा प्रवाह बंद होते.
पाळीव जनावरे सुद्धा प्लास्टिक खाऊन मूत्यूमुखि पडत असल्याच्या घटना सुद्धा होऊ शकतात. प्लास्टिक कचरा जाळल्याने निर्माण होनारा वायू नागरिकांच्या आरोग्य ,जीवनाला घातक ठरतो त्यामुळे शासनाने प्लास्टिक वर बंदी घातली आहे.

मात्र शिरजगावबड ग्रामपंचायत कडून कोणत्याही प्रकारची प्लास्टिक कचर्याची ढिगारे यावर कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे.मात्र ग्रामविकास अधिकारी यापासून अज्ञभित असल्याचे चित्र दिसुन येत आहे. काय नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन अशीच खेरि खेळत राहनार तरी का?अशा प्रकारे चर्चा परिसरात नागरिकांच्या जोरात सुरू आहे