अकोट शहरात शांता बाई ची धूम >< जननी मोहीमेंला तुफान प्रतिसाद

0
1492

अकोट/संतोष विणके – अकोला जिह्याचे पोलीस अधीक्षक राकेश कला सागर ह्यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या जननी2 ह्या उपक्रमा अंतर्गत आज पोलिस कर्मचारी निलेश गाडगेंनी साकारलेल्या शांता बाई ने अकोट शहरात धूम केली.निमित्य होते जननी २ मोहीमेच्या जनजागृतीपर पथनाट्याच्या सादरीकरणाचे. महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरन करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कला सागर व अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर ह्यांनी जननी कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक महिला पर्यंत जाऊन त्यांना कायदेशीर दृष्ट्या व सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्याचा सकारात्मक प्रयत्न सुरू केला आहे. त्या साठी जननी2 अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येत आहेत.याअंतर्गत पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनाखाली आज दि.१७ ला दर्यापूर रोड वरील शिवाजी महाविद्यालयाच्या पंजाबराव देशमुख सभागृहात पोलीस कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या व सादर केलेल्या पथनाट्य चे आयोजन केले होते. त्याला विद्यार्थिनीची भरघोस उपस्थिती लाभली.

सदर पथनाट्य मध्ये महिला व मुलीवर होणारे अत्याचार व त्याला महिला व मुलींनी कसे सामोरे जाणे गरजेचे आहे ह्याचे महत्व पटवून देण्याचा यशस्वी प्रयत्न पोलिस कलाकारांनी केला.पथनाट्या मध्ये मुलीच्या जन्मा पासून ते शेवट पर्यंत होणारे विविध अत्याचार व त्याला सक्षम पणे तोंड देण्या साठी काय उपाय योजना आवश्यक आहे ह्याचे ज्ञान पथनाट्यातील शांता बाई ने उपस्थित मुलींना देऊन त्यांची मने जिंकली. पथनाट्यातील प्रत्येक प्रसंगानंतर मुलींनी जोरदार टाळ्या वाजवून त्यास दाद दिली, पथनाट्य ची गरज व महत्व पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी मुलींना सुरवातीला समजावून सांगून पथनाट्य चे सादरीकरण करण्यात आले, निलेश गाडगे ह्यांचे पथनाट्य व त्यानंतर चोपडे मॅडम ह्यांनी सादर केलेले मार्शल आर्ट चे प्रात्यक्षिक मुलींचे मन जिंकून गेले एकूणच पथनाट्यातील शांता बाई ने मनोरंजनातून मुलींना फार मोठी शिकवणूक दिली, कार्यक्रमाला शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास कुलट, वाघ , कोठेकर, प्रशांत कोठे , अनंत सिरसाट, वैद्य मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.