अकोटात भर पावसात हजारोंच्या गर्दीत पार पडले इंदोरीकर महाराजांचे किर्तन

0
2850

अकोट/संतोष विणके – संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या हास्य विनोदी कीर्तनाने प्रसिद्ध असणारे हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या आकोटातील किर्तनाला भर पावसात हजारोंच्या गर्दीचा जनसागर लोटला होता. कै.दत्तुजी हांडे यांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त स्थानिक कास्तकार सभागृह येथे इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते यावेळी इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी भर पावसात २० ते २५ हजारांच्या वर नागरिकांची भरगच्च उपस्थिती होती.विशेष म्हणजे कीर्तनाला हजारोंच्या संख्येने महिलांनी गर्दी केली होती तर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी गाड्या भरभरून हजेरी लावली होती.इंदोरीकर महाराजांचे कीर्तनाने आकोटातील अध्यात्मिक क्षेत्रात पार पडलेल्या कार्यक्रमापैकी आणखी एक गर्दीचा विक्रम नोंदवला हे विशेष.यावेळी इंदोरीकर महाराजांनी आपले विनोदी ग्रामीण बाजातील कीर्तन सादर करून भाविकांसह सर्वसामान्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांनी आपल्या कीर्तनात समाजामध्ये लग्न संबधात झालेले बदल,विवाह संस्थेचे बदलते स्वरूप ,कौटुंबिक स्तरावर ढासळत चाललेले संस्कार ,आदींबाबत रोखठोक विवेचन केले.विनोदी पद्धतीने केलेले हे विवेचन श्रोत्यांना विचार करण्यास भाग पाडून गेले. समाजात असणारी वास्तव स्थिती इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून मांडल्याने क्षणोक्षणी टाळ्यांचा कडकडाट केला जात होता यावेळी महाराजांनी अध्यात्म व भक्तीचे मानवी जीवनात असलेले महत्त्व अनेक उदाहरण देऊन सांगितले आपल्या कीर्तनात ते म्हणाले की ज्ञान असेल तर देव मिळेल आणि जिथे ज्ञान आहे तिथे देव आहे म्हणूनच ज्ञानदेव हे जीवनाचे सार आहे.त्यांच्या कीर्तनातील विचार एकण्यासाठी शेवटपर्यंत हजारो श्रोते हजर होते.सभागृहात मुंगी शिरायलाही जागा नसतांना सभागृहाबाहेर तेवढीच गर्दी महाराजांना स्क्रीनवर ऐकत होती तर त्याहुन जास्त गर्दी परीसरात मिळेल त्या जागेचा आडोसा घेऊन महाराजांना ऐकत होती. तत्पूर्वी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी आपल्या हास्य विनोदी प्रबोधनपर भाषणाने श्रोत्यांना अंतर्मुख केले या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप वसू महाराज यांनी आपले अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले. तद्नंतर इंदोरीकर महाराजांचे आगमन होऊन मुख्य कीर्तनाला सुरुवात झाली.यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ. संजय गावंडे, महेश गणगणे रमेश हींगणकर,नवनीत लखोटीया,चंचल पितांबरवाले ,छाया काञे,काशिराम साबळे,शंकरराव वाकोडे,राहुल कराळे, तहसिलदार विश्वनाथ घुगे,ना.तहसिलदार राजेश गुरुव,यांच्यासह ईतर मान्यवरांची उपस्थीती होती.कार्यक्रमाचे सुञसंचालन संजय आठवले यांनी केले.तर पाहुण्याचे स्वागत आयोजन समीतीचे सतिश हांडे,ब्रम्हाकुमार पांडे,चंद्रशेखर बारब्दे यांनी केले.दरम्यान कार्यक्रम सुरु होण्या अगोदार पशुसंवर्धन व दुग्धविकास मंञी ना.महादेव जानकर यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन कै. दत्तुजी हांडे यांच्या प्रतीमेला.हारार्पण केले .यावेळी इंदोरीकर महाराजांच्या किर्तनामुळे कार्यक्रम स्थळाला वारीचे स्वरुप प्राप्त झाले होते.