शेगांव येथील स्पोर्टींग क्लब वर पोलिसांचा छापा

0
1749
Google search engine
Google search engine

शेगांव:- बुलडाणा जिल्ह्यतील शेगांव शहरातील लोहारा रोड वरील मालक विनोद धर्मराज सुळ यांच्या ओमकार सपोर्टींग क्लब मध्ये त्यांचा भाऊ प्रमोद धर्मराज सुळ हा निर्धारित केलेल्या खेळांशिवाय अवैध जुगार पैशाच्या हारजीत वर खेळवल्या जात आहे. अशी माहिती शेगाव शहरचे गुप्त हेर कडुन त्यांना मिळाल्यावरून शनिवारी खामगाव विभागाचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक घुगे यांना माहिती देऊन त्यांच्या पथकाच्या मदतीने आपला विस्वस्थ पाठवून या माहितीबाबत दुजोरा घेतला विस्वस्थ सुत्राने दिलेल्या माहितीवरून शनिवारी रात्री या स्पोर्टिंग क्लब वर धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये 48 जुगारी व मालक रंगेहात घटना स्थळावरुन अटक करण्यात आली. याशिवाय सपोर्टींग क्लबचा मालकला हि अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोखरक्कम सह एकूण 22 लाख 74 हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये सोने ,मोटर सायकली, ब्रेझा कार, ८१ मोबाईल व रोख रकमेचा समावेश आहे.
यात परीसरातिल नामी लोक असुन ऐका पत्रकाराचा सुध्दा समावेश आहे.
आज २२/०७/१८ रोजी स्थानिक  न्यायालयात नेऊन त्यांची जमानत केली जाईल की पोलिस प्रशासन काही वेगळी कार्यवाही करते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष्य   लागले आहे.