महसूल विभागाचे रेती तस्करी वर दुर्लक्ष

0
911

चांदुर बाजार येथे मोठ्या प्रमाणावर रेती तस्कर सक्रिय, पोलिसांच्या कार्यवाही सुरू,
स्थानिक पातळीवर महसूल विभाग मंडळ अधिकारी ,तलाठी,कोतवाल का करीत नाही कार्यवाही ?

चांदुर बाजार:-

चांदुर बाजार तालुक्याला जवळपास चारही बाजूने मोठ्या प्रमाणावर नदीचा वेढा आहे.यात प्रामुख्याने पूर्णा नदीचे पात्र ही मोठया स्वरूपाचे आणि लांब आहे.त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेती घाट आहे.मात्र आपला आर्थिक जास्त लाभ व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर रेती ची तस्करी ही सुद्धा सुरू आहे.
तालुक्यातील अनेक रेती घाटातून मोठ्या प्रमाणावर रेती ची वाहतूक होत आहे.पावसाळा सुरू असल्याने कोठे तर या अवैध रेती तस्करीमुळे पायवाटा बंद झाल्याचे चित्र आहे.
चांदुर बाजार महसूल विभागात तालुका दंडाधिकारी यांच्या सह नायब तहसीलदार मंडळ अधिकारी कोतवाल याची एकूण संख्या जवळपास 100 घरात आहे.तरी मात्र रेती ची तस्करी मोठ्या प्रमाणात सक्रिय कसे ?अशा प्रश्न आहे.आता पर्यत झालेल्या कार्यवाही मध्ये थेट तहसीलदार यांच्या आदेशावरून कार्यवाही झालेच चित्र आहे.त्यामुळे महसूल चा सर्वात महत्वाचा कणा समजला जाणारा स्थानिक पातळीवर काम करणार तलाठी वर्ग हा मुख्यलयीन राहत नाही.तसेच याचा फायदा तालुक्यातील बरेच कोतवाल घेत असल्याचे चित्र आहे.
तसेच नदीच्या पात्रामधून रेती ची वाहतूक करण्यात यावी यासाठी काही ठिकाणी कच्चा रस्ता सुद्धा तयार करण्यात आला आहे.तर काही ठिकाणी मंडळ अधिकारी आणि तलाठी याना आपल्या विश्वासात घेऊन रेतीचा गोरख धंदा सुरू आहे.त्यामुळे सात मंडळ आणि एकूण 40 च्या वर साझा कार्यलाय आहे.मात्र प्रत्येक कार्यवाही तहसीलदार यांच्या आदेशानुसार करण्यात येतात.मग मंडळ अधिकारी ,तलाठी कार्यलाय, कोतवाल हे यांचा महसूल विभागाला काय फायदा अशा प्रश्न महसूल विभागात आपले घर तयार करीत असल्याचे दिसत आहे.तर यांच्या चांदुर बाजार येथील तालुका दंडाधिकारी तहसीलदार शिल्पा बोबडे कशी लगाम लावणार हे पाहावे लागतील.
बॉक्स मध्ये:-
<span;>तालुक्यातील अनेक रेती तस्कर यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार यांनी तहसील कार्यलाय मधील कर्मचारी यांचे पथक तयार केले.मग स्थानिक पातळीवर जवळ पास मंडळ अधिकारी,तलाठी ,कोतवाल यांची संख्या संपूर्ण 80 वर आहे.मग रेती तस्कर यांच्यावर कार्यवाही हे महसूल विभाग कार्यवाही का करत नाही.त्यासाठी वेगळे पथक कश्यासाठी अशा प्रश्न आहे.
दोन ते तीन दिवसा अगोदरच आसेगाव पोलिसांनी चोरट्या मार्गानी होणारी रेती चोरीचा डाव हाणून पाडला.तर शिरजगाव कसबा पोलिसांनी सुद्धा चोरीचा ट्रक्टर  भर दिवसा पकडला.त्यामुळे रेती चोरी जोरात सुरू असल्याचे दिसून येते आहे.

</span;>