शिवदास बोरघरे करजगाव शाखा अध्यक्ष

0
1000

यरेडल तेली समाज करजगाव शाखा अध्यक्ष शिवदास बोरघरे यांची निवड

करजगाव येथे पार पडला कार्यक्रम

करजगाव प्रतिनिधी:-
चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव या ठिकाणी नुकतीच यरेडल तेली समाज कार्यकारणी गठीत झाली असून या कार्यकारणी करजगाव चे अध्यक्ष म्हणून शिवदास बोरघरे यांची निवड करण्यात आली.

यावेळी तेली समाजाचे जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारणी मधील पदाधिकारी उपस्थित होते.त्याच प्रमाणे करजगाव येथील यरेडल समाज मधील नागरिक उपस्थित होते.