चांदुर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयच आजारी ,जनप्रतिनिधी देणार का लक्ष?

0
1255
Google search engine
Google search engine

 

चांदुर बाजार ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे रिक्त,घटत आहे ओपिडी ची संख्या,ग्रामीण रुग्णालयच आजारी
जन-प्रतिनिधी आणि वरिष्ठ यांचे याकडे दुर्लक्ष

चांदुर बाजार :-प्रतिनिधी

मानवाचे आरोग्य चांगले राहावे या साठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न घेत असताना चांदुर बाजार तालुक्यातील स्थानिक ग्रामीण रुग्णालय याच आजारी असल्याचे चित्र आहे.पण या कडे जनप्रतिनिधी का लक्ष देत नाही आहे हा प्रश आता जोर धरत आहे तर याकडे वरिष्ठ सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तसेच या ठिकाणी एकूण विविध विभागातील 28 पदे मजूर करणयात आले आहे.मात्र या ठिकाणी 21 पदच कार्यरत असून 9 आणि महत्त्वाचे पद रिक्त आहे.त्यामुळे याकडे जनप्रतिनिधी कधी लक्ष देणार हा प्रश्न आहे.

चांदुर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात  रिक्त असणारे पद खालीलप्रमाणे आहे.वैधकीय अधीक्षक वर्ग 1-दीर्घकाळ पासून रिक्त ,वैधकीय अधिकारी वर्ग 2 -3 पदे मंजूर असून या ठिकाणचे 2 पदे रिक्त आहे.त्यामुळे या ठिकाणी साळकर मैडम यांनाच रुग्णालयात दिवस रात्र पाळीने काम करावे लागत असल्याचे  दिसत आहे.दंत शल्य चिकित्सक वर्ग 2 पद रिक्त आहे.सहाय्यक अधिक्षक वर्ग 3 चे पद भरलेले असून मात्र त्या ठिकाणी काम करणारे वैधकीय अधिकारी हे अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक या ठिकाणी कार्यरत आहे.कनिष्ठ लिपिक वर्ग 3 चे एक पद रिक्त आहे.त्यामुळे एकाच लिपिक या ला या ठिकाणी काम करावे लागत आहे.प्रयोगशाळा सहायक हे सुद्धा पद रिक्त असून या ठिकाणी काम करणारं कर्मचारी हे अचलपूर उपजिल्हारुग्णालत कार्यरत असल्याची माहिती आहे.तर शिपाई सुद्धा निलंबन झाल्याने पद रिक्त आहे.तर दंत शल्य चिकित्सक सहाय्यक गट ड पद रिक्त आहे.त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्ण याची योग्य प्रकारे सोय होत नसल्याने ओपिडी ची संख्या घटत असल्याचे चित्र आहे.या सर्व याकडे जन प्रतिनिधी यांनी लक्ष देणायत यावी अशी मागणी नागरिकडून होत आहे.

वरील रिक्त असलेल्या पदी वैधकीय अधिकारी नसल्याने तात्काळ येणाऱ्या रुग्ण याची मोठ्या प्रमाणात गैरसोय पाहायला मिळत आहे.तर या मुळेचे या ठिकाणी रुग्ण याच्या मधील ग्रामीण रुग्णालय बाबत असंतोष निर्माण होते आहे.लाखो रुपयांचे इमारत बांधकाम मात्र अधिकारी च नाही अशी अवयस्थ चांदुर बाजार ग्रामीण रुग्णालय ची आहे.