हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे श्रीगुरूंचेच कार्य ! – श्री. धिरज राऊत, हिंदु जनजागृती समिती >< अमरावती शहरात गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

0
1363
    भारत स्वतंत्र झाला; मात्र न्याययंत्रणा, शिक्षणव्यवस्था, राज्यव्यवस्था इत्यादी सर्वच गोष्टी आपण इंग्रजांकडून आहे तशा स्वीकारल्याने आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळालेच नाही. एकीकडे देश सेक्युलर आहे, असे म्हणायचे आणि सर्व सुविधा मात्र अल्पसंख्यांकांना द्यायच्या, अशी आजची स्थिती आहे. या देशातील हिंदूंना सातत्याने दुय्यम वागणूक दिली जात आहे. त्यामुळे हिंदूंना पुन्हा एकदा सन्मानाने जगण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन, धर्माचरण करून हिंदु राष्ट्रासाठी यथाशक्ती योगदान दिले पाहिजे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण यासाठी कटिबद्ध होऊया. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे काळानुसार श्रीगुरूंचेच कार्य आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. धिरज राऊत  यांनी या वेळी केले. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटनांसह आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. हा महोत्सव शुक्रवार, २७ जुलै २०१८ या दिवशी सायं ५.३० वाजता शुभम मंगलम, बडनेरा रोड याठिकाणी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. तसेच देशभरात १०९ ठिकाणी असे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरे झाले.
\
     महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.या वेळी आपत्काळात समाजसाहाय्यासाठी आवश्यक प्रथमोपचार प्रात्यक्षिके आणि बचाव अन् आक्रमण शिकवणारी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला मारूती ट्रेडींग कंपनीच्या श्रीमती कल्पना शरद राठी, लॅबलाईनचे श्री. राजेश सेवानी, शुभम मंगलमचे मालक श्री. अशोकजी अजमेरा, रामगिरी हॉटेलचे मालक श्री. सुनील जयस्वाल आणि ह.भ.प. पातशे महाराज, डॉ सुरेश चिकटे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद डाऊ, श्री. अमोल जगदाळे, श्री. मिलींद साखरे, श्री. अभय कडुकार, कु. शबरी देशमुख, कु. आकांक्षा कावरे, कु. स्नेहल कामळे , सनातन संस्थेचे श्री. गिरीष कोमेरवार, सौ. विभा चौधरी, श्री. विलास सावरकर, डॉ. श्री. रमेश वरूडकर, श्री. शिवप्रतीष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दिक्षीत, श्री. करण धोटे, यांसह विविध संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.