एकतर्फी प्रेमातून कसबे सुकेणे येथील तरुणीची हत्या

0
1413
Google search engine
Google search engine
नाशिक :- उत्तम गिते 

निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे तरुणाची वडीलासमोरच हत्या झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजता घडली या घटनेत सदर तरुणी जागेवरतिचा मृत्यू झाला कसबे सुकेणे या गावात संतप्त वातावरण आहे विद्या ढेगळे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे मौजे सुकेने येथील सुरज दिगंबर चव्हाण वय २८ शेजारील कसबे सुकेणे येथील विद्या ढेगळे वर एक तर्फी प्रेम करत होता हे दोघेही नाशिक येथे महिंद्रा कंपनीत कामाला होते.

आज दिनांक ३१ रोजी दोघेही गावी असताना सदर तरुण मुलीच्या घरी गेला त्यावेळी दोघांचे बोलणे झाले तरुणांच्या डोक्यात राग असल्याने सूरज चव्हाण या तरुणाने तिच्या वडिलांसमोर मुलीच्या अंगावर चाकूने हल्ला केला मुलीचे वडील सोडवण्यासाठी आले त्या तरुणाने तिच्या वडीलांनाही जखमी केले.या घटनेत सदर तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला.

त्यानंतर सदर मुलगा स्वतःहून ओझर पोलीस स्टेशनला हजर झाला या घटनेने दोघेही गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे पोलिसांनी सदर गुन्हा दाखल करून घेतला आहे.